पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/321

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २८० ) ॥ १३६६ ॥ वाचे वदवी रमनेते चाखवी। नेत्राते दाखवी परि या दुरी ।। १ ।। बुद्धी बोधावता चित्ता चेतबीता। देहीं देहातीता कैसेनि दाऊ॥२।। भावी भावातीत अद्वैत अद्वैत । ज्याते श्रुती ह्मणत नेती नैती ॥ ३ ॥ निळा ह्मणे काही नव्होनियां जे आहे । दाविती याचि सोय सङ्गुरु संत ।। ४ ।।। ॥ १३६७ ।। दृष्टिविण देखणे रसनोवण चाखणें । शब्देविण बोलणें ऐसे आहे ॥ १ ॥ चरणेंविण चालणे निजकविण घेणे । श्रवणेंविण ऐकणे तेथीचें गुज ॥ २ ॥ चित्तेविण चितणे बुद्धीविण जाणणे । भनेंविण अनुभ- येणें अनुभव्यातें ।। ३ ।। निळा ह्मणे गगनें गगना आलिंगन । पवनासर्वे गमन पवना जेंवी ॥ ४ ॥ | ॥ १३६८ ॥ पाहों जातां देखणें तें चि । जाणतां जाणणे चि होईने अंगें ।। १ ।। आतां तें कैसे सांगानें यावरि । दोलतां चि वैखरि गिळुनि जाये ॥ २ ॥ बुद्धीच्या प्रवेशे बुद्धी चि हरपे । मन जेथ संकल्पे सहित विरे । ३ ।। निळा ह्मणे चित्ता नुरे चित्तपण। आनंदा मुरवण आनंदें या ॥ ४}} | ॥ १३६९ ॥ ह्मणोनियां शब्द न पवे चि तत्वता । वुद्धिचिया माथा चळवे कोण ॥ १ ॥ मना पचना केंाव घडेल संचार । श्रुती परात्पर ह्मणती ज्यते ॥ २॥ नाद बिंदु कळा ज्योती हे बोलणीं । आरौती निर्वाण विरती तेथें ॥ ३ ।। निळा ह्मणे वर्म नेणति ते सकळे । वाचके वाचाळे से तावीण ॥ ४ ॥ | ॥ १३७० ॥ होऊनियां ते चि राहीले निवात । रूप अखंडित रमती संत ॥ १ ॥ निय निरामय अखंड अद्य । ध्याती देवत्रय ज्याते सदा ॥२॥ एकविस स्वर्गाते कवळुनि राहीले। सूर्या प्रकाशिले जेणें तेजें ॥ ३॥ निळा ह्मणे कृपा करूनियां सद्गुरु । देती अभय करु सास फावे ॥ ४ ॥ ॥ १३७१ ॥ हरीवीण आहे कोण । सान मोठे वेगळे ।। १।। सर्वांचा ही सर्वसाक्षी । अध्यक्षी हैं नाम सा ॥ २ ॥ कम ऐसे देता फळ । सत्ता केवळ हे ज्याची ॥ ३ ॥ निळा ह्मणे ईटे उभा । परि हा नभा व्यापक ॥ ४ ।। |॥ १३७२ ॥ समोर सदा सर्वांकडे । मार्गे पुढे वेष्टित ।। १ । कां हो नेणा इरि ऐसा । जैशा तैसा परिपूर्ण ॥ ३॥ उदका अंगी जैसा रम्नु । गगनीं अवकाशु घनदाट ॥ ३॥ निळा ह्मणे अंतर्बाहे । त्याविण आहे कोण दुजें ॥४॥