पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/313

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रूपं । तें ही स्वरूप ऐलाडी ॥ ३ ॥ निळा ह्मणे जाणों जातां । जाणोनि नेणता वेद जेथे ॥ ४ ॥ ॥ १३१३ ॥ भेद चि याचा नये हाता । जाणिवा जाणतां नाना परी ॥१॥ मत मतांतरें वृथा चि होती । याच्या न पवती दारवंदा ॥ २ ॥ पाहों जातां बुद्धीचे डोळे । होताती आंधळे समोर या ।। ३ ॥ निळा ह्मणे नेदी चि कोणा । देव आपणां लपवितम् ॥ ४ ॥ | ॥ १३१४ ।। आत्मा नाही चि देखिजे ऐसा । उजळितां प्रकाशी रवि- कीर्ण ॥ १ ॥ असोनियां पाठीं पोटीं । न देखेचि दृष्टी देखण्या ॥ २ ॥ लै- नियां सर्वांगभरी । अमोनि वाहेरी नादळे ॥ ३ ॥ निळा ह्मणे उगम जैसा । न देखे चि सहसा सागर ।। ४ ।। ॥ १३१५ । साचिमाजी होती जाती । जिव या नेणती आत्मया ।।५।। नवल याची लाघवी माया । यातें नैदेउनियां विस्तार ॥ २ ॥ जेथे तेथे उभी चि आड । होउनियां कवाड भ्रांतीचे ॥ ३ ।। निळा ह्मणे ब्रह्मादिकां । याचिपरी लोकां झकविलें ॥ ४ ॥ | ॥ १३१६ ॥ अवघियांचे अमोनि देहीं । अंतवही न दिसे चि ॥ १ ॥ जैवि साखरेमाजी गोडी । न दिसे उघडी असतां ही ॥ २॥ वाद्य दिसती न दिसे नाद । जेवि का स्वाद भोजनीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे तैसा आत्मा । न दिसे चि भूतग्रामा कवळुनी ॥ ४ ॥ ॥ १३१७ ॥ आंतु वाहेरि देखणा चि दिसे । परि तो आभासे दृश्य ऐसा ॥ १ ॥ ज्ञानेंचिविण वाया गेला । वोध मावळला सयाचा ॥ २॥ याविण दिसते देखते कोण । परि ये नागवण भ्रांतीची ॥ ३ ॥ निळा ह्मणे आठ व ने धरे । तेणें चि अंतरे हातोहातीं ॥ ४ ॥ ॥ १३१८ ॥ पदार्थमात्र आठवे जरी । नलगे चि तरी साधन ॥ १ ॥ एरवी दिसे देखणा तो चि । पाहिजे त्याची परि कृपा ॥ २ ॥ अवध' चि। वसोनि अवघे ठायीं । दिसे दाखवी ही अवघ्यांतें ॥ ३ निळा ह्मणे भोगी यागी । तो चि जगीं जगदात्मा ॥ ४ ॥ ॥ १३१९ ॥ नये चि साच हा प्रतीती । असोनियां भूत भगवंत ॥ १ ॥