पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४७ ) ॥ ११४९ ॥ धिक् याचे जन्मांतर । न देते पंढरपुर महा पापी ॥ १ ॥ अहारे कर्मा बलवत्तरा । नेला अघोरा भोगावया ।। २ ।। नेदी चि उपज विश्वास मनीं । पंढरी हे नयनीं देखावया ॥ ३ ।। निळा सणे, संग्रह होतां । पापाचा आईता उघडला तो ॥४॥ ॥ ११५० ॥ न देखे जो पंढरिनाथ । झाला होहाभूत जन्म त्याचा ॥ १॥ वाया गेला पतला नेला । नाहीं अठावला हरि अणुन ॥ २ ॥ कैंचें तो पंढरपुर । पदरी अपार दोषमळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे देईल झाडा। जाउनी पुढां यमदंड ॥ ४ ॥ | ॥ ११६१ ॥ वाळिलें जें पंढरिनाथें । याचे कोण कार्य येथे ॥ १ ॥ घाला आपणा बाहेरी । नका सांगों याची थोरी ॥ २ ॥ आगम पाहिला वेदांत । चित्त विषयाएँ सतत ॥ ३ ॥ धर्ने माने केले वेडे । सुख नेणती ते बापुडे ॥ ४ ॥ मान इच्छा चार जीवीं । काय करू ते गोसावीं ॥५॥ जाती ह्मणोनी आना ठाया । निळा दुरी पासुनी नयां ॥ ६ ॥ | ॥ ११६३ ॥ पांडुरंगा न पाहाती । ज्ञान गाडेवर बोलती ॥ १ ॥ सांचे न व्हावे दर्शन । देवा दुषीती ह्मणउन ॥ ३॥ नाईकाचे यांचे बोल । विठ्ठल कुपेवीण फोल ॥ ३ ॥ निळा ह्मणे करिती कथा । अवघी पोकळ यांची वृथा ॥ ४ ॥ ॥ ११५३ ॥ जया नावडे पंढरी । निरयवासी तो अघोरी ।। १ ।। विठो- बासी निदी वाचा । यमदंड तो पावे साचा ॥३॥ न घे विठोबाचें नाम । वृथा गेला त्याचा जन्म ॥ ३ ॥ निळा ह्मणे प्रेतरूप । याचे पुण्य ते चि ने पाप ॥ ४ ॥ | ॥ ११५४ ॥ विठ्ठल नाहीं ज्या ठाउका । परमार्थ चि साचा बुटिका ॥ १ ॥ करितो ते पदासाठीं । बाष्कळ अवधीच चावट ॥ ३॥ दावील ते जाणा मोंग । धरुनी परमार्थाचे अंग ॥ ३॥ निळा ह्मणे टिळे माळा । धरिला वृथा तो भोंपळा ॥ ४ ॥ ॥ ११६६ ॥ असोतु ऐसियाच्या गोडी । काय करुनी लाभा तुटी ।। १ ॥ गाऊ विठ्ठलु सांवळा । आठवू तो वेळोवेळां ॥ २ ॥ जया चरणीं ब्रीदभार । वांकि किंकिणी झणत्कार ॥ ३ ॥ निळा ह्मणे तुळसीमाळा । पदक एका- बळी गळां ॥ ४ ॥