मायाजाल । विराली तळमळ कल्पनेची ॥ ३ ॥ निळा ह्मणे भोग याग ।
साचे पांडुरंग हो सरला ॥ ४ ॥
| ॥ ११०७ ॥ एका विठ्ठल चि ठेविला । निहीं निश्चये अपुला ॥ १ ॥
ते चि विठ्ठल झाले आतां । माह सांडोनियां ममता ॥२॥ देवावीण सहसा
कांहीं । दुजें तया उरलें चि नाहीं ॥ ३ ॥ निळा म्हणे स्वानुभव ल्याले।
विठ्ठल चि अंगें होउनि ठेले ॥ ४ ॥
| ॥ ११०८ ॥ झाली भाग्याची उजरी । इष्ट देवतां चि पंढरी ।। १ ।।
विले तो कर कटीं । जेणे अवलोकिला दिठी ॥ २॥ चंद्रभागे केले
स्नान । भक्ता पुंडलिकाचे दर्शन ॥ ३ ॥ निळा म्हणे वैकुंठवासी । प्राणी
होईल तो निश्चयेमीं ॥ ४ ॥
॥ ११.०९ ॥ याचे पाय धरल्या भाव । भेटेल देव निश्चयें ॥ १ ॥
नव्हे अन्यथा भाषण । ठावी खूण संतांसी हे ॥२॥ निजे करें कुरवाळून ।
देईल आलिंगन आत्यादरें ॥ ३ ॥ निळा म्हणे येईल दारा । देव सामोरा
धांवोनियां ॥ ४ ॥
॥ १११० ॥ आपुली धणी पुरे त घ्यावें । उरलें ठेवावें तैमें चि ।। १ ।।
भरला आहे हा सागर । न लगे अंत पार कोणासी ॥ २॥ उदंड़ मानें
झाले सुखी । आतां ही आणखी पावतील ॥ ३ ॥ निळा म्हणे नित्य
नवा । आहे हा ठेवा जगादीचा ॥ ४ ॥
॥ ११११ ॥ आहे आरुष बोलणें । नव्हे नाणे टांकसाळीं ॥ १ ॥
नको घेऊ ख-यासाठीं । येईल तुटी एखादा ॥ २ ॥ पाहतां दसा कळेवरी ।
अभ्यंतरी गैरमाळ ।। ३ ।। निळा म्हणे निवडुनी ठेवा । आतां देवी
एकीकडे ॥ ४ ॥
॥ १११३ । वाचे बोलविलें देवें । मज हे काय होते ठावें ॥ १ ॥
सहज नामें आळवितां । औघ आला हा अवचिता ॥ २ ॥ संत जणिती
अंतर । की हा रखुमाईचा वर ॥ ३ ॥ निळा म्हणे पुसिळी गोळी । न ये
सांगतां ते गोमटी ॥ ४ ॥
॥ १११३ ।। उगा चि वदचितां कां गा । वाचा माझी पांडुरंगा ॥ १ ॥
कोणा न रुचे ऐकतां । हांसों लागती तत्वतां ॥ २ ॥ म्हणती रचिलें हैं।
51
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/282
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
