पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/279

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २३८ ) चालतां । एकात्मता ने खंडे ।। ३ ।। निळा म्हणे आले घरा । मुख माहेरा विश्रांति ॥ ४ ॥ | ॥ १०८६ ॥ ऐसी जोडलिया सत्संगती । परम विश्रांति भाविकां ॥ १ ॥ ब्रह्मानंदाचे पारणे । नित्य स्मरणे श्रीहरिच्या ॥ २ ॥ सकळ ही लाभाच्या संपत्ती । सामोप्या धांवती परमार्थिक ॥ ३॥ निळा म्हणे कृत्य झालें । ज्यालागी आले नरदेहा ॥ ४ ॥ ॥ १०८७ ॥ मी ज्या वोलिलों निगुती । संतकृपेच्या त्या युक्ती ॥ १ ॥ येरवी हैं काय जाणे । प्रसादाचे करणे त्यांचिया ॥ २ ॥ छाया चित्र नाचवितां । प्रकाशितां दीप यासी ॥ ३ ॥ निळा म्हणे माझे कर्म । जाणती वर्म ते संत ॥ ४ ॥ ॥ १.०८८ ॥ ते चि माझे सर्वसाक्षी । अहेनि कॅपक्षीं ह्मणोनि ॥ १ ॥ काय केलें इतरां जनां । भरली भावना त्रिविधा ॥ २ ॥ ठावें ज्याचें तया वर्म । आणिकां दुर्गम जाणतियां ॥ ३ ॥ निळा ह्मणे व्याली जाणें । वांझे वायाणे तिडकांचे ।। ४ ।। ॥ १०८९ ॥ अर्थ जाणती अनुभवी । वृण टावी जयां ते ॥ १ ॥ संत- कृपेची ते जाति । कवणे रिती ते कैसी ॥ ३॥ कळे तथा खरे खोटें । धीट पाटे प्रसादिक ॥ ३ ॥ निळा ह्मणे अंतरींचें । प्रेम साचें कीं लटिके ।। ४ ।। } १०९० ॥ अगमगी काजवे । रात्री दिवसा नव्हे ठावें ॥ १ ।। म्हणोनियां न ये मोला । नाश पदरी असे त्याला ॥ २॥ दिसे पतंगाचा रंग । नाहीं धुतन्या तोंवरी चांग ॥ ३ ॥ निळा ह्मणे परमहंस । झाला बहुरुपी परि ते फोस ॥ ४ ॥ | ॥ १०९१ ॥ ज्याचे अंतर त्या ठावें । उमटेल बाहेरी क्रियाभावें । १ ।। ह्मणोनियां धीर करा । माजिधरींचे येईल दारा ॥ २ ॥ नव्हे आघा तुरडा खेळ । सत्ता ज्याची त्याचे बळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे आहे धणी । शिरीं संपन्न सवा गुणीं ॥ ४ ॥ ॥ १०९२ ॥ ज्याचा आहे या अभिमान । मी तों रंक अनाथ दीन ॥ १ ॥ नलगे देणे हा परिहार । होईल सयाचा आदर ॥ २ ॥ जेणे केलेले