१ २२८ }
॥ १०३३ ॥ सोने असे सोनेपणें । अलंकार लेणे होय जाय ॥ १ ॥
तैसें चराचर होतां जातां । वस्तु अखंडता अखंड ॥ २॥ नाना मृग
जळ दिसे भासे । भूमिका ते असे कोरडी च ॥ ३ ॥ निळा म्हणे घटमट
मोडीं । अवकाश परवडी नाहीं तया ॥ ४ ॥
॥ १०३४ ॥ येत जाती वर्पती मेघ । गगन ते अभंग जैसे तैसें ॥ १ ॥
तैसीं च ब्रह्मांडे अनेक होती जाती । स्वरूप ते अद्वैतीं अद्वैत ॥ २ ॥ नाना
नदिया नट वेप । परि तो आपणांस भिन्न नव्हे ॥ ३ ॥ निळा ह्मणे नाना
वस्त्राकार तंतु । दाउनी आपणाने आपण ।। ४ ।।
| ॥ १०३५ ॥ जिवाचाही जीव माझ्या शिवाचा शीव | पंढरीचा देव
मन बुद्धी इंद्रिये ॥ १ ॥ अईका हो श्रोते तुह्मी मंते सज्जन । मी माझे हैं
जतन कोण करी यावरी ॥३॥ नयनाचे हि नयन माझ्या प्राणाचे घ्राण ।
श्रवणाचे हि श्रवण तो चि रमनेची रसना ।। ३ ।। त्वचेचीही खचा माझे
वाचेची वाचा । बोलविसी वोलाचा तो चि अर्थ तात्पर्य ॥ ४ ॥ कराचे हि
कर माझ्या चरणाचे चरण । चैतन्याचे चैतन्य तो चि मनाचे मन ॥५॥
निळा ह्मणे भुक्ति मुक्ति विरक्ति ज्ञान । शांति क्षमा दया तो चि सिद्धी
साधन ॥ ६ ॥
| ॥ १.०३६ ॥ सुखानंदाची राणिव । भागा आली फावली सर्व ॥ १ ॥
घ्याल ते घ्या रे धणीवरी । अभाल जे जे या अधिकारी ॥ २ ॥ फुकासाठी
बोळोनि लें । घरासी देव हे चांगले ॥ ३ ॥ निळा ह्मणे उग नका।।
मानू अवघे हि ऐका ।। ४ ।।
| ॥ १,०३० ॥ न सांपडे ऐसी कधीं । वेळ लागली ते संधी ॥ १ ॥
हरिचे गुण वाचे यावे । श्रवणीं श्रवण ते करावे ॥ २ ॥ गेली जातील
वर्षे काळ । आयुष्या वेंचुनियां निफळ ॥ ३ ॥ निळा म्हणे यालागीं
करा । वेगें आतां चित्तीं धरा ।। ४ ।।
| ॥ १०३८ ॥ गेला फिरोनियां दिवस । न ये घटिका लव निमिष ॥ १॥
आहे तो चि भरा हातीं । महा लाभाची संपत्ती ॥२॥ मागे नागवली
फारें । गेली वांया नारीनरें ॥ ३ ।। निळा ह्मणे म्हणोनि जागा । सडनी
बोरबार वाउगा ।। ४ ।।
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/269
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
