( २२५ )
देईल भिकारी । कोण सेवा याची करी ॥ २ ॥ जाती तया घरा । जेथे
लक्ष्मीचा वारा ॥ ३ ॥ निळा ह्मणे हीना । आड टाकिली कल्पना ॥ ४ ॥
| ॥ १.०१२ ।। भाग्यहीन द्वाड । तया वृद्धि करी नाङ ॥ १ ॥ सुख तें
सन्मुख । तया ते चि भासे दुःख ॥ २॥ हित अनहिता वारी । देखोनियां
पळे दुरी ॥ ३ ॥ निळा ह्मणे उफराटें । प्राक्तन होऊनियां भेटे ॥ ४ ॥
॥ १०१३ ॥ नट्टा सज्जना एक चि वाट । परि अनिष्ट इष्ट फॐ ॥ १ ॥
एका उत्तम वैकुंठ बाम । जाणे निरयास हैं एका ।। ३ ।। जाता येत
सारिखे चि दिसती । परि ते पावती पद भिन्न ॥ ३॥ निळा म्हणे अचित
फळ । भोगवी कपाळ ज्याचे त्या ॥ ४ ॥
॥१०१४ आपणा समान केले त्यामी । धरिलें ज्यासी निज हातीं ॥१॥
ऐसा देवो कृपासिंधु । ह्मणोनि बंधु दीनांचा ॥ २ ॥ हीनत्व देखोनि भक्तां
अंगीं । लाजे जगीं याचेनि ॥ ३ ॥ निळा म्हणे करुनी थोर । चालवी
बहिवार निजांगें ॥ ४ ।।।
| ॥ १०१५ ॥ आंवरुनियां ज्यांनी चित्त । ठेविलें सतत हरिचरणीं ॥ १ ॥
झाली याची कार्यसिद्धी । तुटल्या व्याधि जन्म जरा || २ ॥ एकविध
भजले देवा । उतरले भव समुद्रातें ॥ ३ ॥ निळा म्हणे निश्चळ पदा। पावले
गोविंदा आठवितां ॥ ४ ॥
| ॥ १०१६ ।। हा चि उपाव सुगम सार । तरणें संसार जया नरा ॥ १ ॥
नाम गाता गोविंदाचें । फिटे जिवाचे जिवपण ।। २ ॥ भुक्ति मुक्ति वोलंगे
थेती । अंगीं चि ठाकती दया क्षमा ॥ ३ ॥ निळा म्हणे अवघीं च सुखें ।
येती हरिखें चोजवित ।। ४ ।।
| ॥१०१७ ॥ गुंतली ते आशा । पहिली मोहजाळ फांसा ।। १. ॥ नदेखो-
नियां श्रीहरी । कर्ता भोक्ता या संसारीं ॥ २ ।। अवघी चि याची सत्ता ।
करवी करितो तलता ॥३॥ निळा म्हणे ऐसी । नेणोनि होती कासाविसी।।४।।
॥'१०.१८ ॥ अभिमानाच्या भुली । ज्या त्या कर्मी लिप्त झाली ।। १ ।।
नेणोनियां ज्ञान भूलें । भोगासक्त पुढे पुढे ॥ २ ॥ संगती अं] आम्ही
केलें । सहजें जें जें धडोन लें ॥ ३ ॥ निळा म्हणे मत्तें ऐसीं । गुंतली ते
काळपाशीं ॥ ४ ॥
29
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/266
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
