पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/264

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २२३ ) जे या दूपिती नामासी । कृत्रिम करिती उपदेशासी ॥ २ ॥ सांगती पाखांइ । वोल वोलोनियां वितंड ॥ ३ ।। निळा ह्मणे जाती । घेउनी नक शिष्यभती ।। ४ ।। ॥ ९९८ ॥ विठ्ठल विठ्ठल वदतां वाणी । चक्रपाणी संतापे ।। १ ।। ह्मणी- नियां लाहो कर । अहो अवधारा अवघे ही ॥ २ ॥ येणें चि नामें वैकुं- ठासी । गेले पापरासी बहु मागें ॥ ३ ॥ निळा ह्मणे सांगती संत । उभवुनी हात पुराणांतरीं ॥ ४ ॥ ॥ ९९९ ॥ येणे चि साधनें । तुटती मंसारबंधनें ॥ १ ॥ ह्मणोनियां कर लाहो । स्मरा रकुमादेवी नाहो ॥ २ ॥ येईल धांवता । धांवोनियां पाचारितां ॥ ३ ॥ निळा ह्मणे हरी । कृपावंत दीनावरी ॥ ४ ।। | ॥ १००० ॥ रानी वनीं घरीं दारी । बसतां उच्चारी हरिनाम ।। १. ॥ तेणें चि माया उतरोनि ग्रांट । पावसी वैकुंठ महज वृत्ती ।।२॥ नगे करणे खटाटोप । करी हा चि जप नामाचा ॥ ३ ॥ निळा म्हणे होईल ऋणी । हा चक्रपाणी तुझा मग ।। ४ ।।। | ॥ १,००१ ॥ होय अंतरी पालट । करितां पाठ हरिनामें ॥ १ ॥ देवा ऐसे देव चि होती । जे या भजती विठ्ठला ।। २ ।। ऐमा याचा प्रताप ठसा । प्रगटे सरिसा नाम जपें ॥ ३ ॥ निळा ह्मणे लटिकें नव्हे । पहा स्वानुभवें आपुलिया ॥ ४ ॥ ॥ १००२ ॥ आंतु वाहेरी सर्वांपासीं । परि हा कोणासी नाहळे ।। १ ।। मोहियलीं मायभ्रमें । संसार संभ्रमें ह्मणोनियां ॥ २ ॥ विस्मरणें चि हा न पडे दिठी । स्वार्थ पोटी विषयाचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे गेली वांया । ऐसा पायोनियां नरदेह ॥ ४ ॥ ॥ १००३ ॥ येथे येउनी केले कायी । विठ्ठल नाहीं आठविला ॥ १ ॥ आहा रे मढ़ा भाग्यहीना । नेलासी पतना मोहम्नमें ।। २ ।। नाही केली सुदिका कांहीं । ये चि भवाहीं पहिलासी ।। ३ ।। निळा ह्मणे लाहोनि हातीं। केली माती आयुष्या ।। ४ ॥ | ॥ १००४ ॥ आतां तरी विचार करीं । ध्याय अंतरी विठ्ठला ॥ १ ॥ नाहीं तरी व्यर्थ चि जासी । पुढे चौन्यायशी भोगावया ॥ २ ॥ जिणे मरणें