( २१६ )
घइली ज्यासी । प्रसन्न वासी देव सकल ॥ २ ।। संतवचनीं विश्वासला ।
पृज्य तो झाला त्रिभुवनीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे संतभेडी । निरसन कोटी
संदेहां ॥ ४ ॥
॥ ९५३ ॥ रंगले ते संतसंगें । झाले अंगें शुद्ध बुद्ध ॥ १ ॥ देव चि
संत देव चि संत । आणिकांहीं करित देव चि ते ।। २ ।। कैंचें तेथें व्यव-
धान । ब्रह्म सनातन पाववितां ॥ ३ ॥ निळा ह्मणे न लभे देवा । अणिती
भावा त्या मंत ॥ ४ ॥
| ॥ ९५४ ॥ उभारुनी वाहो ध्वज । सांगती पैज घेउनी ॥ १ ॥ विठ्ठल
ह्मणा विठ्ठल ह्मणा । कळिकाळ आंकणा मग तुह्मां ।। २ ।। लहान थोरां
नारीनरां । करिती हांकारा विश्वाचिया ॥ ३ ॥ निळा ह्मणे तत्वता बीज ।
देताती सहज निवडुनी ॥ ४ ॥
| ॥ ९६५ । नाहीं तरि संत झकवित कोणा । थोरलहाना सारिखे चि
॥ १ ॥ नाहीं तेथे काने कोचे । उघड्या वाचे उच्चार ॥ २ ॥ न लगे पूज-
नासी धन वित्त । एक चि चित्त भाव पुरे ॥ ३ ॥ निळा ह्मणे उपदेश देती ।
कानीं सांगत विठ्ठल ह्मणा ।। ४ ॥
॥९८६ ॥ एक चि वचन मानस पायौँ । ठेविलें नवाई काय सांग ॥ १ ॥
धन्य ते संत धन्य ते संत । जाणती हृद्भत सकळांचें ॥ २ ॥ दवडुनी
अभिमान देवो चि देती । आणिकांहीं करिती आपणासे ॥ ३ ॥ निळा
ह्मणे अघटित चर्या । लागतां चि पायां पालटती ॥ ४ ॥
| ॥ ९५७ ॥ वणितां चरित्रे न पुरे धणी । वाचा लांचावली हरिच्या
गुणीं । स्वानंदाची उघडली खाणी । नामस्मरण मातली ॥ १ ॥
अधिक अधिक स्फूर्तीचा प्रसर । आगळीं अक्षरे चालती भार । नेणों
फुटले हे चिदांवर । मेघवृष्टी न्यायें होतसे ॥२॥ वारतांही नावरे
मती । लिहितां न पुरे हे दिवसराती॥ न कळे काय केलें होतीं। देउनी प्रसाद
आपुला ॥ ३ ॥ अवघं चि उघडुनियां भांडार । दृष्टी दाविलें सारासार ।।
लेवउनियां ते अलंकार । केळे समोर बोलावया ॥ ४ ॥ अक्षरे वाचे येती ।
ते ते प्रमयेसीचि उठती ।। नेणों गुंफुनी ठेविलीं होतीं । ते चि प्रसाद
वोपिलीं ॥ ५॥ नाहीं वाचेसी गुंता गोवा । तात्पर्यार्थ चि हा अधवा ॥
ऐसा योजुनियाँ बरवा। मुहुर्त दिधला समथ ॥ ६॥ निळा आईया पिठावरी।
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/257
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
