( २१४ )
संतसंगै निज शांती वादे । साधन हृदय अखंडित ॥ २॥ संतसंगै इरिचीं
भक्ति । संतसंगें ज्ञान विरक्ति ।। संतसंगें भुक्ति मुक्ति । साधका वरिती
अनायासें ॥ ३ ॥ निळा ह्मणे साधुसंग । महाभाग्याचे हे भाग्य । सेविती
ते स्वरूप चांग । पावती आत्मया श्रीहरिचें ॥ ४ ॥
| ॥ ९३९ ॥ ब्रह्म मंपत्ती घरी तया । आवडे जय संतसंग ॥ १ ॥
त्रिकालज्ञानी होय तो नर । आत्म साक्षात्कार भोग प्राप्ती ॥२॥ शांती दया
क्षमा सिद्धी । बोलतां समाधी चालतां ॥ ३ ॥ निळा कोणे एवढा
लाभ । जोडे या स्वयंभ भाग्यवंता ।। ४ ।।
| ॥ ९४० ।। अढळ वैराग्य प्रगटे अंगीं । वसतां संग संताचिया ॥ १ ॥
दिव्य भोगीं विटे मन । मृत्तिकेसमान सोने रुपें ॥ २॥ परमामृतीं नाहीं
चाड । अप्सरा दुवाड वाटत या ।। ३ ।। निळा ह्मणे इह लोकींचे । भोग
ते साचे वमनापार ॥ ४ ॥ ।
॥ ९४१ ॥ सद्रुकृपा वोळली तया । जे पंदरिया अनुसरले ॥ १॥
भक्ति ज्ञान वैराग्यशिळ । शती अदळ निर्वैरता ॥ २ ॥ भूतदया
मानसीं वसे । मातले प्रेमरसे गर्जती ॥ ३ ॥ निळा ह्मणे हृदयीं ध्यान ।
मुखीं नामचिंतन अहानिशी ।। ४ ।।
॥ ९४२ ।। कृपा केली संतजनीं । लाविलों भजन श्रीहरिच्या ॥ १ ॥
नाही तरी जातों वायां । लक्ष भोगावया चौन्यायसी ॥ २ ॥ आणिका
साधन गुंता चि पडता । अभिमान वाढता नित्य नवा ।। ३ । निला ह्मणे
धांवों केलें । सुपंथें लाविलें नीट वाटे ॥ ४ ॥
॥ ९४३ ॥ बरे झालें शरण गेलों । संत लाविलों निज सोई॥ १ ॥
म्हणती पंढरपुरींचा हाः । करी बोभाट हरिनामें ॥ २ ॥ येईल तो घरा-
वरी । धरील श्रीहरी हृदयेसीं ॥ ३ ॥ निळा म्हणे एके चि खेपे । खंडती
पार्षे सकळही ॥ ४ ॥
| ॥ ९४४ ।। ऐमा संतांचा उपकार । काय मी पामर आठवू ॥ १ ॥
करूनियां अनुमोदन । दिधलें वचन अभयाचें ॥ २ ।। ह्मणती करीं नाम-
पाठ । न करी खटपट याविण ॥ ३॥ निळा मणे कृपावंत । करील सनाथ
श्रीहरी ॥ ४ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/255
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
