पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २१३ ) परिधान केलीं दिव्यांवरें ॥ ३ ॥ संतनामें निळा ह्मणे । मुगुट कुंडलें करकं- कणें ॥ ४ ॥ | ॥ १३२ ॥ पुरातन मी शरणांगत । अहँ स्थापित सद्गुरुचा ।। १ ।। अणोनि संत पाळिती माते । देउन भातें प्रेमरस ।। २ ।। जे उनी उरला प्रसाद देती । निकट बैभविती जवळीकें ।। ३ ।। निळा ह्मणे क्षणक्षणा । देती स्मरणा श्रीहरिच्या ॥ ४ ।।। |॥ ९३३ । मस्तक माझा पायांवरी । राहो निरंतरी संतांच्या ॥ १ ॥ इतुलेन मी कृतकृय । होईन निश्चित संसारीं ॥ २ ॥ धरिल्या जन्माचे सार्थक । भवभयमोचक साधन हैं ॥ ३ ॥ निळा ह्मणे नलगे फार । करणे विचार यावरी ॥ ४ ॥ | ॥ ९३४ ॥ एक चि आशीर्वाद देती । जरि अवलोकिती कृपेनें ॥ १ ॥ तरि या पावविती पदा । जेथे सर्वदा रमती मुनी ॥ २ ॥ निश्चयाचे देणे त्याचें। हरित जीवाचें जीवपण ॥ ३ ॥ निळा ह्मणे अगाध वाचा । संत वरदाचा महिमा हा ॥ ४ ॥ | ॥ ९३५॥ पावले ते झाले सुखी । ज्यांची वोळखी संतचरणीं ॥ १ ॥ कीटक पतंग पशुयानी । मानस सत्संगती उद्धरले ॥ २॥ जिहीं विश्वास धरला पायीं । तरले ते दोहीं भवाब्धीच्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे निर्वाणरूप । पावले स्वरूप श्रीहरिचें ॥ ४ ॥ ॥ ९३६ ॥ नामधारक हरिचे दास । करिती नाश पापाचा ॥ १ ॥ वसती त्यांच्या सहवासे ते । होताती सरते वैकुंठीं ॥ २॥ यमधर्म लागती पायां । लोकत्रया माजी धन्य ।। ३ ॥ निळा ह्मणे हरिहर देव । करिती राणीव त्याच्या घरीं ॥ ४ ॥ ॥ ९३७ ।। धन्य काळ आजिचा दिवस । हरिचे दास भेटले ॥ १ ॥ दंडवत घालीन पायां । करीन काया कुरवंडी ॥२।। पाप ताप दैन्य गेले । येथुनी पाउले देखतां ॥ ३ ॥ निळा ह्मणे पावलों फळ । केलिया निर्मल सुकृतातें ॥ ४ ॥ ॥ ९३८ ॥ संतसंमें हरे पाप । संतसंगै निरसे ताप ।। संतसंगें निर्विकल्प । होय मानस निश्चळ ॥ १॥ संतसंगें वैराग्य घडे । संतसंगें विरक्ती जोडे ।