पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/253

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( २१२ ) विलोभता । मोह न बाधी या ममता ॥ ३ ॥ निळा म्हणे निज ध्यासें । झाले मुक्त शुका ऐसे ॥ ४ ॥ | ॥ ९२५ ॥ मी चि माझा विस्मय करीं । नवल परि देखोनी ॥ १ ॥ कैस येणें पांडुरंगें । अंग अंगें लपविलीं ।। २ ॥ पळही मात्र विसर देहीं । न पडे चि ठायीं व्यापियलें ॥ ३॥ निळा म्हणे नाम वाचे । गुण याचे आटवती ॥ ४ ॥ ॥ ९२६ ॥ कैंची आतां जिवा उरी । आंत बाहेरी कोंदला ॥ १ ॥ नेदी पडों कोठे उणें । वाचा करणे चाळितु ॥ २॥ भोग भोक्ता आपण झाला । वाटुनी प्याला अभिमाना ॥ ३ ॥ निळा नामें रूपें नाहीं । भासे देहीं विठ्ठल ॥ ४ ।।। ॥ ९२७ ॥ अवध्या अंगें अवधे झार्यो । अवघे चि ल्यालों अलंकार ॥ १॥ अवघ्या ठायी अवघ्या देहीं । अवघ्यां नाहीं वेगळा ॥ २ ॥ अवश्यां जवळी अवघ्या दुरी । अवध्यां परि सारिखा ॥ ३ ॥ अवघा निळा अवघ्या संगें । अवघ्या रंगे रंगला ॥ ४ ॥ ॥ ९२८ ॥ संतांचिया समागमे । गाऊ नामें आवडी ॥ १ ॥ काय आमचें करील काळे । कळीचे मळ नातळतां ॥२ ।। हरिच्या नामें शुचिर्भूत । वाचा पुनीत करचरण ।। ३ । निळा ह्मणे घडी घडी । करू हे जोडी निस नवी ॥ ४ ॥ | ॥ ९२९ ॥ अपार संत झाले क्षिती । ऐकिले ऐकाल पुढेही होती ॥ १ ॥ जे जे झाले हरिचे दास । करितां कीर्तने सांडुनी आस ॥ २ ॥ दर्शने मुक्ति आणिकां देती। उदंड पावन केल्या याती ।। ३ ।। निळा ह्मणे सनकादिक । आदि करुनी अनामिक ॥ ४ ॥ ॥ ९३० ॥ पशु पक्षी श्वापद याती । भुंग पतंग कटक जातीं ॥ १ ॥ हरितें भजतां हरिरूप झालीं । निजानंद निमग्न ठेली ॥ २ ॥ दैय दानव निशाचर । मानव याती नारीनर ॥ ३ ॥ निळा ह्मणे भजतां हरी । अगा- धपणे पावले थोरी ।। ४ ।। ॥ ९३१ । एकएकाहुनी आगळे । विले संत कंठमाळे ॥ १ ॥ नेणें विराजलेती हरि । प्रभा फांकली दिगांतवरी ॥ २१॥ संत चरित्रे सुंदरें।