पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/252

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रिये ईटेवरी । उभा द्वारी पुंडलिका ॥ २ ॥ संत केला परोपकार । आम्हां उद्धार दीनांचा ॥ ३ ॥ निळा म्हणे जवळी नेलें । हात दिले निरउनी ॥ ४ ॥ ॥ ९१८ ! न हों अविश्वासी तैसे । अधम जैसे कृतन ॥ १ ॥ केले उपकार ते सतीं । आठवू चित्तीं प्रीतीनें ॥ २ ॥ ते चि करिती भाभिमानें । सय वचनें आपुलीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे ने सर्दूि वाट । दाविली नीट संत ते ॥ ४ ॥ | ॥ ११९ ॥ शोधुनियाँ आले संत । हिताहित जगाचें ॥ १॥ ते चि वचनें अनुवादती । मुकळां नीति प्रमाणे ॥ २ ॥ मयासय ठावें तयां । पाहोनियां ठेविलें ॥ ३ ॥ निळा म्हणे गुंता गोवा । कांहीं चि जिवा न करिती ॥ ४ ॥ ॥ ९२० ॥ उत्तीर्ण त्याचें नहिजे आतां । जीव हि अर्पिता थोडा चि ॥ १॥ वाळुनी सांहूँ काया । बरुली पायां संतांच्या ।। २ ।। मायबापा काय द्यावें । कैसे व्हावे उतराई ॥ ३ ॥ निळा म्हणे ज्याची कृपा । जन्म खेपा निवारी ॥ ४ ॥ | ॥ ९२१ ।। ज्यांची वचनें ऐके देर । पंढरिराव भीतीनें ।। १ । भेटविती भेटे तया । पसरूनियां निज कर ॥ ३ ॥ जें जें तया वाटे गोड । तें तें कोड पुरउनी ॥ ३ ॥ निळा ह्मणे जवळी राई । यांची पाहे निज वास ॥ ४ ॥ ॥ ९२२ ।। दृढ विश्वासें हरिमी भजतां । सायोज्यता पावले ॥ १॥ ऐसे भक्त नेण किती । झाले ननिती पुराणें ॥ २ ॥ जिहीं केलें पिंडदान । पदीं मन भाषेसी ।। ३ । निळा म्हणे त्यांची कीर्ति । संतहि गाती कीर्तन ॥ ४ ॥ | ॥ ९२३ ॥ भवसिंधु यां पायवाट । माया घाट उतरले ॥ १ ॥ गर्जत विठोबाच्या नामें । गेले व्योमें निज पंथें ॥ २ ॥ परब्रह्म चरावरी । भेटले हरि विश्वात्मया ॥ ३ ॥ निळा म्हणे जोडलीं पदें । ब्रह्मानंदें दुल्लती ॥ ४ ॥ ॥ ९२४ ।। नामचिंतनै जडली प्रीति । भगवद्भावना सर्व भूर्ती ॥ १ ॥ हैं चि परमार्था साधन । मुस्त्रीं नाम हृदय ध्यान ॥ २ ॥ विषयभोग