पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/240

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


धडी । आशा चिंता झाली वेडी ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसे झालें । इरिच्या नामें हरि चि केलें ॥ ४ ॥ | ॥ ८३६ ॥ दृश्य नेणती आभास । अवघा ब्रह्मचा प्रकाश ॥ १ ॥ तया नाहीं दुजी परी । एकाविण उरली हरी ॥ २ ॥ अवघे चि नेणोनी जाणते । अवघ्यां राहिले आतौते ॥ ३ ॥ निळा ह्मणे जनीं वनीं । अवघ्या अंगें जनार्दनीं ॥ ४ ॥ । ८३७ ॥ नाहीं भिन्नत्व उरलें । अवध्या अं अवघं झालें ॥ १ ॥ नेणती ते मानामान । जन तैसे तयां वन ।। २ ।। न लगे साधन त्या संपत्ती। देव चि झाले स भूतीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे एकाएक । एक चि होउन ठेले लोकीं ॥ ४ ॥ | ॥ ८३८ ॥ एक्या जिवे एक्या भावें । एक चि एकले एक्या देवें ॥ १ ॥ एकाएक एक चि झाले । एका अंगीं विरोनि गेले ॥ २॥ एक चि केले निजानुभवें । एक चि झाले एक्या नांवें ॥ ३ ॥ निळा ह्मणे एकाए । एक चि झाले तिहीं लोकीं ॥ ४ ॥ | ॥ ३९ ॥ उच्चारितां नाम वाचे । झाले त्याचे स्वरूप चि ।। १ । नाहीं तया उरले दुजें । आत्मतेजें जग भासे ।। २ । ब्रह्मानंद निमग्नवृत्ति । विराजती स्वानंदें ॥ ३ ॥ निळा ह्मणे गुणातीत । अखंडित निज बोधे ॥४॥ ॥ ८४० ॥ अंगीं ऐश्वर्य येउनी बाणे । तुमचे भक्तीची लक्षणे ॥ १ ॥ हैं तो मान्य होय जगीं । विश्व वेदी तयालागीं ॥२॥ शांती क्षमा आलिया बस्ती । संतलक्षणाची प्रशस्तीं ॥ ३॥ काम क्रोध मोडली चाली। सर्व भूत साम्यता झाली ॥ ४ ॥ तुटोन गेले आशापाश । नुरोनि कल्पना निःशेष ॥ ५ ॥ निळा ह्मणे नाहीं ममता । कृपा तुमची ते अनंता ॥ ३ ॥ | ॥ ८४१ ॥ भूत भगवंत देखिला । मानामान सहज चि गेला ॥ १ ॥ तुमचे कृपेची हो जाती । स्वरूप वेध झाला वृत्ती ॥ २॥ द्वेषाद्वैप निंदा नेणें । चिंता असुया पळती भेणें ॥ ३ ॥ निळा ह्मणे भूतमात्र । झाला कृपेसी तो धात्री ॥ ४ ॥ |॥ ८४२ ॥ सर्वकाळ एकात्मता । जोडली त्या भाग्यवंता ॥ १ ॥ ज्याचा गेला अहंकार । गळोनियां मद मत्सर ।। २ ।। जें जें दृष्टीपुढे देखे।