पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/239

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( ११८ } करित रासक्रीडे १० ॥ गौळणी रंजवी नानापरी । दही दूध लोणी त्यांचें चोरी ॥ उणे पडतां त्यांचिये घरीं । अधिक चि करी चादु- नियां ॥ ११ ॥ गाई मागे धांवे रानीं । घोंगडे काठी पांवा घेउनी ॥ नाना परीची खेळे खेळणीं । लीलाविग्रही अवतारी ॥ १२ ॥ ऐशीं अगाध दिव्य चरित्रे । गाती ऐकती त्यांचीं गात्रे ॥ अवध होउनियां पवित्रे । जाती वैकुंठा निळा ह्मणे ॥ १३ ॥ संत महिमा. FL - ॥ ८३१ ॥ धन्य त्याची तया माय प्रसवली । ज्याची निष्ठा जइली विठ्ठलरूप ॥ १।। विठ्ठल आसनी विठ्ठल भजनीं । विठ्ठल शयन न विसं- बती ॥ २ ॥ त्याचे सर्व काम पूर्ण मनोरथ । करील हा नाथ पंढरीचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे ज्याचा हेत पांडुरंगीं । रंगले ते जमीं धन्य झाले ॥ ४ ॥ ॥ ८३२॥ काय त्यांचा महिमा चानू वारंवार । हरिभक्त थोर भूर्म- डळीं ॥ १ ॥ ज्याचिये भेटीचे आर्त ब्रह्मादिकां । पूज्य सकळ लोकां विश्वा झालें ।। २ ।। यमधर्म वास पाहे निय काळ । ह्मणे धन्य वेळ भेटती ते ।। ३ } निळा ह्मणे सर्व भाग्यें चोजविती । रिद्धि सिद्धि येती वोळं- गणें ।। ४ ॥ ॥ ८३३ ।। कळिच्या काळा नागवती । जिहीं विठ्ठल धरिला चित्त ॥ १ ॥ ते चि देव झाले अंगें । अहं मोह ममता यागें ।। २ ॥ देहें चि असोनि देहातीत । भौगी अभोक्ते सतत ॥ ३ ॥ निळा म्हणे नामासाठीं । विठ्ठल सांठविला पोटीं ॥ ४ ॥ ॥ ८३४ ॥ नेणती ते अपिपरे । विश्व झाले विश्वभर ॥ १ ॥ नाहीं देहाची भावना । करितां नाम संकीर्तना ॥ २ ॥ हरिच्या नामामृतें धाले। गिनी ब्रह्मांडा राहिले ॥ ३ ॥ निळा म्हणे अवघ्या चि परी । झाले व्यापक चराचरीं ॥ ४ ॥ ॥ ८३५॥ काम क्रोध पळती दुरी । माया तृष्णा आपापरी ॥ १ ॥ विठ्ठल नामाचिया गजरें । दोष गेले दिगांतरें ॥ २ ॥ अहं ममता देश-