पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/235

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( १९४ ) हरिच्या ऐसे अंगीं बळ ॥ प्रगटे वैराग्य अढळ । तुटती मळ ममतेचे ॥ ४ ॥ महा दोषाची झाडणी । अहंभावादिकांची गाळणी ॥ उभय कुळे वैसउनी । जाती विमानी वैकुंठा ।। ५ ।। ऐसा नामाचा प्रताप । नेदी उरों पुण्यपाप। भंगुनियां त्रिविध ताप । ठाकती सद्रूप होउनी ॥ ६ ॥ दृश्य नुरे याचिये दृष्टी । ब्रह्मानंदें कोंदे सृष्टी ॥ निळा सणे धरित कंठीं । बीजमात्र इरिनाम ।। ७ ॥ | ॥ ८०८ ।। विठ्ठलनामाचा प्रताप । लेश उरों नैदी पाप ।। १ ।। त्रिविध नापाची वोहरी । विठ्ठलनामाच्या उच्चारीं ॥ २॥ दैन्य दुःख निर्दाळिलें । विठ्ठल नामें ऐसे केलें ॥ ३ ॥ निळा ह्मणे शांती सुखें । विठ्ठल विठ्ठल ह्मणतां मुखें ॥ ४ ॥ | ॥ ८०९ ॥ लोहा आळा साविकाचा । पूर अद्भुत या प्रेमाचा ॥ १ ॥ तेणे लागती वोसाणे । स्वानंद चि नामस्मरणें ॥ २ ॥ मनोमन तळप- ताती । गोड अथति कवळिती ॥ ३ ॥ निळा ह्मणे उभय तीरें । ओते वक्ते निर्मळ निरें ॥ ४ ॥ | ॥ ८१.० } श्रवणकथेचे सादर । करिती नर सभाग्य ते ॥ १ ॥ सुख पावोनियां विश्रांती । मोक्षपदा जाती सुखरूप ॥ २ ॥ अगाध महिमा भगवद्णीं । संत पुराण गर्जती ॥ ३ ॥ निळा ह्मणे हरिचें नाम । सकळा भस्म करी पापा ॥ ४ ॥ ॥ ८११ ॥ नायें तारिले पातकी । मुक्त झाले मृत्युलोक ॥ १ ॥ ऐसे बोलियले वाल्मीक । महाभारत व्यामादिक ॥ २॥ कलियुग हरिकी- र्तन । करितां तरले अधमजन ।। ३ ॥ निळा म्हणे असंख्यात । हरिच्या नामें झाले संत ॥ ४ ॥ ॥ ८१२ ॥ शिंपी सोनार चांभार । ब्राह्मणादि नारी नर ।। १ ।। हारच्या कीर्तने हरिचे भक्त । होऊनि ठेले जिवन्मुक्त ॥ २ ॥ सुतार कुंभार यवन । अंयजादी हीन जन ॥ ३ ॥ निळा म्हणे क्षेत्र शूद्र । वैश्यहि पावले मुक्तिपद ॥ ४ ॥ | ॥ ८१३ ॥ योगाभ्यास साधतां चि सांग। येती उपसर्ग सिद्धीचे ॥ १॥ कैंची तेथें हरिसी भेटी । विवंचना शेवट काळाची ॥ २ ॥ विचारित