( १९२ )
हरी । कीर्तन गजरी करूनियां ॥ ३ ॥ निळा ह्मणे धन्य ते वाणी । गर्जत
गुण सर्वदां ॥ ४ ॥
॥ ७९५ ॥ इंद्र चंद्र महेंद्र सर्व । मानवती देव हरिभक्तां ॥ १ ॥ म्हणती
इहीं चि केला ऋणी। चक्रपाणि कीर्तनें ॥२॥ नेदि तिये वैकुंठासी । आपणा
चि पाशीं गोवियला ॥ ३ ॥ निळा ह्मणे हे सदैव सदां । कीर्तने गोविंदा
रंजविती ॥ ४ ॥
॥ ७१६ ॥ कीर्तन केलें ब्रह्मानंदें । ध्रुव प्रल्हादें एकनिष्ठ ॥ १ ॥ तयां
केलें सुखसंपन्न । त्रैलोक्य मान वादउनी ॥ २॥ तैसे चि शुक नारदमुनी ।
पावले कीर्तन समाधिसुख ॥ ३॥ निळा ह्मणे बहुत संतां । कीर्तनें अद्वैता
मेळाविलें ॥ ४ ॥
| ॥ ७१७ । कीर्तनाचा घोष गजर । ऐकतां अपार उद्धरले ॥ १ ॥ ऐसे
किती सांगावे ते । कीर्तने मरते वैकुंठीं ॥ २ ॥ आदिकरुनी स्त्रिया वाळे ।
कीर्तनकल्लोळे हरिपदीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे श्रोते वक्ते । एकात्मतेते
घावले ॥ ४ ॥
| ।। ७९८ ॥ सांगों जातां न कळे वाचा । महिमा कथेचा अपार ॥ १ ॥
श्रवणें पठणे हरिची कीर्ति । नाना याति उद्धरल्या ॥ ३॥ चतुष्पदें श्वान
सुकरें । श्रवणद्वारे मुक्ति खां ॥ ३ ॥ निळा ह्मणे कीटक पक्षा । कीर्तने
वृक्ष हरिप्राप्ती ॥ ४ ॥
| ॥ ७९९ ॥ कीर्तनरंगें रंगलें जें जें । तें तें सहजें हरिद्रीय ॥ १ ॥ येर
मुमुक्षु जे जे होती । कीर्तनें पार्वती ते लाभा ॥ २ ॥ महा अनुष्ठान हरिची
कथा । नित्य जोडतां सुखप्राप्ती ।। ३ ॥ निळा ह्मणे कैवल्यपद । पाववी
अभेद हरिकीति ।। ४ ॥
॥ ८०० ॥ सुखें भिक्षा मागोन खावें । हरिचे करावें कीर्तन ॥ १ ॥ कलि-
युग हे साधनसार । भवसिंधु पार पाबविते ॥ २॥ नेयोनियां गुणदोष ।
करावे घोष हरिनामें ।। ३ । निळा म्हणे सुगम सिद्धी । तुटती उपाधी
सकळही ॥ ४ ॥
। ८०१ ॥ कोणाची हि न धरुनी अशा । भजावें जगदीशा कीर्तने ॥ १॥
मग तो कृपेचा सागर । उतरील पार भवसिंधु ॥ ५ ॥ तोडुनियां ममता
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/233
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
