पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/231

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १९० ) ॥ ७८१॥ केला माझा अंगीकार । ठेविले कर जेणें कटीं ॥ १ ॥ आतां सुखी नाहीं उणें । नामस्मरणें याचिया ॥ २ ॥ तीर्थं व्रतें तपोवने । वसती स्थाने भासती ॥ ३॥ निळा म्हणे साधन सिद्धि । दर्शनें उपाधी निर- सिल्या ॥ ४ ॥ ॥ ३८२ ॥ अठवितां नामें सुखाची संतुष्टी । लार्भे लाभ कोटी मुकृ- ताचा ॥ १ ॥ म्हणउनि हैं। चि घेउनियां छंद । गातुसे गोविंद विठ्ठल हरी ॥ २ ॥ ज्याचिया स्मरणें हरे द्वैतबाध । अवघा चि उपाध माया भ्रांती ।। ३ ॥ निळा म्हणे नित्य वैष्णवां साधन ॥ हें चि अनुसंधान दिव- सरातीं ॥ ४ ॥ | ॥ ७८३ ॥ नित्यानंद धोपें करितां हारेचे कीर्तन । श्रोते आणि वक्ते होती परम पावन ॥ १ ॥ आणिक हि लोक तरती यांच्या सहवासे । थाळ्याभोळ्या भाविकांसी लाभ अनयासें ।। २ ।। जेथे निस नाम घोष डाळिया गजर । तेथें रंगी नृत्य करी रुक्मिणीवर ।। ३ ।। निळा ह्मणे तो चि प्रसन्न होउनी दासासी । भुक्ति आणि मुक्ति ठेवी याच्या सहवासीं ॥ ४ ॥ | ॥ ७८४ ॥ केले सुखी फार ! कहीं न करितां विचार ॥ १ ॥ कोण याती कैसे कुळ । नामें आळावतां कृपाळ ॥ २ ॥ केले वरिष्ठ सकळां । प्रेम देउनियां गळां ॥ ३ ॥ निळा ह्मणे वादविले । वैकुंठ ते सरते केले ॥ ४ ॥ ॥ ७८६॥ जिव्हाग्री ठेवितां चि गोड । पुरै कोड सकळही ॥ १ ॥ ते या विठोबाचें नाम् । सर्वदा निष्काम फळदातें ॥ २ ॥ उच्चार चि करितां ओंठीं । जालित कोटी पापाच्या ॥ ३ ॥ निळा ह्मणे साधन ऐसें । मुलभ चि नसे दुजें आन ॥ ४ ॥ ॥ ७८६ ॥ विठोबा विठोबा नामोच्चार गोड । सरे येथे चाड सकळि- कांची ॥ १॥ मासा आईकत्या एक चि नव्हाळी । वैकुंठ राजळी वसावया ॥ २॥ न लगती सायास करणे योगाभ्यास । नाचतां उदास कीर्तनमेळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे जन्म चुके थोड्यासाठीं । उच्चारितां ऑडी ऐ नामें ॥ ४ | ॥ ७८७ ॥ रात्रि पळे येतां चि सविता । सिंहगर्जनें कुंजर चळता ॥ १ ॥ तैसें हरिभक्तां सांकडें । येतां चि पळे दृष्टिपुढे ।। २।। महालक्ष्मीचे वारे ।