पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ ७७४ ॥ सहज चि नाम आलें वाचे । करीत दोषांचे निर्मुल ॥ १ ॥ ऐसी व्यास गर्ने वाणी । महिमा पुराण विख्यात ॥ २ ॥ पापी चांडाळ दुरात्मे ते । नामें चि सरते वैकुंठीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे गणिका वाल्हा । अजामेळ उद्धरिला गजेंद्र ।। ४ ।। | ॥ ७७५ ॥ तरले नामें अनेक तरती । वैकुंठा जाती घोषगजरें ॥ १ ॥ ऐसा याचा कीर्तिमहिमा । उत्तमा अधमा सरिमाची ॥ २ ॥ कलियुगीं तो सुगम सार । नामोच्चार हरीचा ॥ ३ ॥ निळा ह्मणे अनुतापेंसी । गाती वैकुंठासी ते जाती ।। ४ ।। | ॥ ७७६ ! नाहीं संदेह करी हा पाठ । पावसी वैकुंठ हरि म्हणतां ॥ १ ॥ जैसे प्रल्हाद उपमन्या धुरु । करितां नामोच्चारु वरिष्ठ पदीं ॥ २॥ नेदी हा आघात लागों वारा । धांवेल सामोरा स्वामी माझा ॥ ३ ॥ निळा ह्मणे घेईल वीसंगा । नेईल जेथे जगा गम्य नाहीं ॥ ४ ॥ | ॥ ७७७ ।। हें चि परमार्थाचे सार । हरिचिया उच्चार नामाचें ॥ १ ॥ जिद्द केला पावले ते । वैकुंठ सरते सुखी झाले ॥ २ ॥ गति बानिन हरिगुण रासी । झाले त्रैलोक्यासी पूज्य ते ।। ३ ।। निळा ह्मणे निका उपावो । सांपडला टावो वैष्णवां ॥ ४ ॥ ।। ७७८ ॥ निजात्मप्राप्तीलागीं सार । हरिचिया उच्चार नामाचा ॥ १ ॥ हैं चि बीज हें चि गुज । हें चि निज निजाचें ॥ २ ॥ ऐसें मंती पुरस्करुनी ।। सांगितलें कान येऊनियां ॥ ३ ॥ निळा ह्मणे परम भाप्ती । नामी चि विश्रांति हरिचया ॥ ४ ।। | ॥ ७७९ ॥ ऐकोनियां हरिनाम घोष । पळती दोष दिगंतर ।। १ ॥ जैवि हनुमंताचिये हांके । कांपती धार्के निशाचरें ॥२॥ अथवा पडतां चि रवि- कीर्ण । जाय हारपोन अंधःकार ॥ ३ ॥ निळा म्हणे घोकिलें जिहीं । घेतला तिहीं अनुभव हो ।। ४।। ॥७८० नामें तुमच गाउनी छंदें । ब्रम्हानंदें नाचेन ।। १॥ धरु- नियां दृष्टीपुढे । पाहेन रूपडे सुरेख ॥ २॥ वारंवार क्षणक्षणा । ठेवीन चरणावरी माथा ॥ ३ ॥ निळा म्हणे पुरवा कौड । तुम्ही चि चांड जाणोनी ॥ ४ ॥