पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अहंभावो । भक्ति सांठविला देवो ॥ २ ॥ नामाचे चिंतन । करुनी केली हा स्वाधीन ॥ ३ ॥ निळा म्हणे निवेसाठीं । करुनी सामाविला पोटीं ।। ४ ॥ | ॥ ७८० ॥ देव चि झाले अंगें । देवी भजतां अनुरागें ॥ १ ॥ शुक प्रल्हाद नारद । अवरुपी रुकमांगद ॥ २ ॥ निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान । नामा सधना आणि जाल्हण ।। ३ ।। कूर्म विसोबा खेचर । सांवता चांगा वटे- श्वर ।। ४ ।। कबीर सेना सूरदास । नरसी मेहता भानुदास ॥ ५॥ निळा म्हणे जनार्दन एका । देव चि होउनी ठेला तुका ।। ६ ।। | ॥ ७५१ ॥ एकाहुनी आगळे एक । झाले हरिभक्त अनेक ॥ १ ॥ भक्ती निजज्ञानें वैराग्यें । देव चि होउनि ठेले अंगें ॥ २ ॥ प्रेमभक्ति अनु- सरले । विठ्ठल देवें ते पूजिले ॥ ३ ॥ निळा म्हणे सांगों किती। न पुरे अल्प माझी मती ॥ ४ ॥ | ॥ ७५२ ॥ हरिरूप ध्यानीं हरिनाम वदनीं । हरिच्या चिंतन तद्रू- पता ॥ १ ॥ हरी तयां अंतरी हरी तयां बाहेरी । रक्षी निरंतरीं श्रीहरी सां ॥ २॥ हरी तयां आसन हरी तयां भोजन । हरी तयां शयन निद्रा करी ॥ ३ ॥ निळा ह्मणे हरी देह गेह दारा। हरी दुजा वारा लागों नेदी ॥ ४ ॥ | ॥ ७५३ ॥ ऐसे हरिचे दास हरिनामी रंगले । हरी चि होनी ठेले एकाएकीं ॥ १ ॥ आपपर तयां न दिमे चि पाहतां । विश्व एकात्मता अवलोकिती ॥ २ ॥ काम क्रोध लोभ मोह ममता माया । पळताती देखो- नियां आशा तृष्णा ।। ३ ।। निळा ह्मणे त्यांच्या दर्शनें चि मुक्त । होतात पतीत महापापी ॥ ४ ॥ | ।। ७५४ ॥ नित्य वदन हरिचें नाम । अंतरीं प्रेम विसावलें ॥ १ ॥ यांच्या भाग्या नाहीं सीमा । पुरुषोत्तमा प्रिय झाले ॥ २ ॥ अावडती ते सर्वदा हरी । न बचे दुरी पासुनी त्यां ॥ ३ ।। निळा ह्मणे मेघःशाम । पुरवी काम सर्व त्यांचे ।। ४ ।। | ॥.७६५ ॥ भक्ति भाव बळकाविला । देव धाविला सोडवणें ॥ १ ॥ झणे मज घ्या पालटासी । सोडा भावासी जाऊ द्या ॥ २ ॥ ते म्हणती हूँ इटिका देवो । आह्मी धरिला भाव न सोहूं ॥ ३ ॥ निळा ह्मणे भावा- साठीं । पडली मिठी देव न सुटे ॥ ४ ॥