पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/222

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही


( १८१ ) या घाली पौटीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे नामावरी । सर्वस्त्रे हा उदार हरी ॥ ४ ॥ ॥ ७२२ ॥ भाव शुद्ध तरी । प्रगटे येउनी अंतरीं ॥ १ ॥ उरों नेदी तया भिन्न । करी आपणा समान ॥ २ ॥ भरोनियां सृष्टी । आपण चि या पाठीपोटीं ॥ ३ ॥ निळा म्हणे राई । कवळुनियां अंतर्बाहे ॥ ४ ॥ ॥ ७२३ । नेदी त्या दुसरें । लाग आणिकाचे वारे ।। १ ।। युगायुग त्याचा । म्हणवी सोयरा निजाचा ॥२॥ लेवनी लेणीं । मिरवी,अळं- कार भूषण ॥ ३ ॥ निळा ह्मणे शांती दया । वोपी भुक्ति मुक्ति तया ॥ ४ ॥ | ॥ ७२४ ॥ अंतरींचा जाणे भेद । प्रगटी आनंद या तैसा ॥ १ ॥ देव माझा चतुर ऐसा । जैशा तैम क्षणमात्रे ॥ ३॥ भाविकांचे अंग चि लोळे । शहाण्या नादळे अभाविकां ॥ ३ ॥ निळा म्हणे परी । सर्वात साक्षी हा ॥ ४ ॥ ॥ ७२५ ॥ जिहाँ धरुनी हरी मनीं । हृदय वदनीं रेजविला ॥ १ ॥ त्याचा झाला अंकित ऐसा । घरिचा जैसा म्हणियारा ॥२॥ न संगत करी सर्व । जाणे गौरव दासाचें ॥ ३ ॥ निळा म्हणे दिवसनिशीं । त्याचपाशी सर्वदा ॥ ४ ॥ ॥ ७२६ ।। निज ध्यास लागला मन । हा चि चिंतन दिवसरात्र || १ ॥ न सुटे चि करू कैसे । लाविले पिसे गोवळे ॥ २ ॥ येउनि जानि पुढे चि उभा । लाविलें भांबा मन माझे ॥ ३ ॥ निळा म्हणे न बचें दुरी । भरला शरीरी न मुटे चि ॥ ४ ॥ ॥ ७२७ ॥ २३ करू काज काम । स्मरवी नाम आपुलें ॥ १ ॥ मागे पढे उभा चि असे । लाविले पिसे श्रीरंगें ॥ २ ॥ श्वात जेवितां जवळ च राहे । परता चि नोहे काय करू ॥ ३ ॥ निळा ह्मणे घातली मिठी । आपणासाठीं मज केली ॥ ४ ॥ ॥,७२८ ॥ भक्त हाका ऐकावया । पसरुनियां कान उभा ॥ १ ॥ कोणी गांजलि एखादा । म्हणोनि गदा सांभाळी ॥ २॥ सर्व काळ साव- धान । निज जन रक्षण ॥ ३ ॥ निळा ह्मणे घाली उडी । भक्त तांती देखोनी ॥ ४॥