( १७९ )
एवढेसे तुह्मां गाईले जि देवा । तेवढे चि स्वीकारुनी तोपलेती भावा
३ ४ ॥ एवढी शी माझी वाचा ते किती । तेवढि चि आपुलिये लाविली स्तुति
॥ ६ ॥ एवढासा निळा एवढीसी भक्ती । अपार चि तुह्मी मानिली
प्रीती ॥ ६ ॥
| ॥ ७०९ ॥ कांहीं चमत्कार देखती । विश्वासे तार वाटे प्रीती १ ॥
ऐसा विपरित आहे मोळा । जाणा येथींचा जी गोपाळा ॥ २ ॥ येहवीं
कोणी फुकासाठीं । नाम नुचरिती ऑठीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे नारायणा ।
ह्मणोनि दाविली सूचना ॥ ४ ॥
॥ ७१० ॥ आधीं च अविश्वासी जन । ह्मणती कैंचा नारायण ॥ १ ॥
कोण तारिले या कालें । लटिकीं बोलती पाल्हाळे ॥ २॥ लटिके संत
लटिका देव । लटिकें चि पाप पुण्य सर्व ॥ ३ ॥ निळा ह्मणे आमुच्या
त्यागें । तुह्मसी निदिजेल जगें ॥ ४ ॥
| ॥ ७११ ।। भक्तिपंथें न चले कोणी । बाट जाईल मोडोनी ॥ १ ॥ जरि
अनाथा धांवणे । न कराल तुह्मी थोरपणे ॥ २ ॥ आमची जन्म वाया गेला ।
शब्द तुझांसी लागला ॥ ३ ॥ निळा ह्मणे नव्हे भली । पुढे वाट खोळं-
बली ॥ ४ ॥
| ॥ ७१२ ॥ येईल चिचासी वें करा । तुह्मी आतां विश्वभरा ॥ १ ॥
आमुचें वायां गेलें जियें। नांदा तुम्ही देवपणे ॥ २॥ केली आम्ही
तोंडपिटी । फजित व्हावया शेवटीं ॥ ३ ॥ निळा म्हणे निजाभिमान ।
तुम्ही सांडिला इमान ॥ ४ ॥
॥ ७१६ ॥ या संतांची ही बोली । बेचने त्यांची लाजविली ॥ १ ॥
लदिका चि केला कीर्तिचोर । येथें तो अवघी च निरास ॥ २॥ माझा चि
मज अनुभव झाला । नाहीं सावधांचा केला ॥ ३ ॥ निळा ह्मणे पालट
बुद्धि । दिसे सुमचे कृपानिधी ॥ ४ ॥
.॥ ७१४ ॥ येईल चिसासी तुह्मां उचित । आपुलें संचित भोगू आह्मी
॥ १ ॥ काय समर्थासी बिनबावें कें । कोण त्याचे ऐके वचन तेथे ॥ २ ॥
थोरा घरीं थोरा होतो बहु मान । कोण पुसे दीन याचकासी ॥ ३ ॥ निळा
ह्मणे आम्ही मानिल विश्वास । तो दिसे निरास अवघी येथें ॥ ४ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/220
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
