पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ १७८ ) भोग । तुह्मी तो अनंग निजरूपें ॥ ३॥ निळा म्हणे जगदाधीशा । आम्ही अशा बांधलों ॥४॥ | ।। ७०५ ।। आणिकांसी मांगे आशेचे वंधन । सदाचा वराडी असोनी आपण ॥ १ ॥ काय म्हणावें यावर आतां । नष्टाचा परम नष्ट हा चि हा पहातां ॥ २ ॥ भक्ताच्या हाताची पहातसे वास । कांहीं देतील म्हणउनी टोकत चि वैसे ।। ३ ।। जळ फळ पुष्प देतां कांहीं चि न सोडी । देॐ जातां चि घाली हा तोंडीं ।। ४ ।। आशेचा बांधला देव हा कैसा । काय निवारील आमुची अशा ॥ ५ ॥ भक्त नेदिती हैं उपवासी चि वैसे । काय खाईल जवळी कांहिंचिया नसे ।। ६ ॥ निळा म्हणे हा अनाथ वापुडा । जाणती संत परि न बोलती भीडा ॥ ७ ।।। | ॥ ७०६ ।। याज्ञिक मंत्रे अवदान देती । त्याहुनि अधिक या उच्छिष्टा बोराची भीती ॥ ५ ॥ हे काय अवगुण नव्हती सांगा । प्रयक्ष ठाउके चि आहेत जगा ॥२॥ सांडनियां से लक्ष्मी ऐसी । भोगितो विद्रुप कौंसाची दासी ॥ ३ ॥ घरींची दह दुधे या न लगती गोडें । चोरदा लोकांची मोडितो कवाडें ॥ ४ ॥ श्रुतिस्मृतीची हीं वचनें नेघोनियां कानीं । हांसे श्लाघे शिव्या देतां गौळणी ॥ ५॥ निळा ह्मणे याची खोडी चि हे ऐशी । ते वोलोनि कार्य मानली यासी ॥ ६ ॥ | ७०७ ।। आणिाखिही याच उदंड बर्मे । बोलतां चि ते नासी आमुच कर्मे ॥ १ ॥ ह्मणोनियां याचे भय चि वाटे । बोलों जाय तंव वोलणे चि कटे ॥२।। वेद हि ना बोले चि भेउन याला । देखोनि याते मग मौन्ये चि ठेला ॥ ३ ॥ काळ हि कांपे याचिया धाकें । यासिाह मिळुनी आपण चि ठके ॥ ४ ॥ ना बोलती योगी याचिया भेणें । ध्यानी चि बैसले चमउनी रानें ॥ ५॥ सत हि याची न करित गोठी । धरुनी राहिले उगले चि पोटीं ॥ ६ ॥ अणु मात्र याच बोलतां चि कर्मे । मरणासि चि मारुनी हरि तो जन्में ॥ ७ ॥ धीटपणे निळा बोलिला कांहीं । वोलतां चि लावला आपुला वाहीं ॥ ८॥ ॥७०८॥ एवढासा माझा भाव तो कायी । तेवढा चि तुमचिये ठेविला पायीं ॥ १ ॥ परी तुमचे अगाध देणें । जाणवलें यावर उदारपणे ॥ २ ॥ एवदिसी माझी मति ते किती । तेवदि चि वाढवुनी केली सरती ॥ ३ ॥