पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वहुत बरे म्हणती भक्त । न बजे परता जवळुनियां ॥ २ ॥ सुखी असा माझ्या बळे । पुरवीन लळे इच्छाल ते ॥ ३ ।। निळा म्हणे कृपाळु हरी । भक्तांवरी तुष्टमान ॥ ४ ॥ ॥ ६९४ ।। मागे पुढे उभा राहे । भरुनी पाहे डोळे त्या ॥ १ ॥ प्रेमासी दृष्टी लागेल झणें । उतरी निवलोण वरुनियां ॥ २॥ पोटीं याला परम प्रीती । आळंगी श्रीपती त्दृदयेंसी ।। ३ ॥ निळा म्हणे करुणा बहुत । झाला या मोहित भक्तांसी ॥४॥ ॥ ६९६ ॥ भक्तां चि साठीं रूपें धरी । पवाडे करी असंख्य ॥ १ ॥ भक्तांसी मानी अपुले सखे । नेदी पारिखे दिसौं त्या ॥ २ ॥ कृपावस्त्र पांघुरवी । जवळी वैसवी आपणा ।। ३ । निळा म्हणे तृप्तीवरि । ब्रह्मरस भरी मुखांत ॥ ४ ॥ ॥ ६९६ ॥ जिणे मरणें नाहीं आतां । हरिच्या भक्तां कल्पांतीं ॥ ५ ॥ त्याच्या ध्यानें तमें चि आलें । आपुला विसरले देहभाव ॥ ३॥ जडोनि ठेली अखंडता । एकात्मता हरिरूपीं ॥ ३ ॥ निळा म्हणे झाले संत । गुणा- तीत निजवोधे ।। ४ ।। ॥ ६९७॥ पूर्ण कृपा झाली तया । गेलों लगटोनियां निन्न चरण ।। १ ।। न देखती ते हरिवीण । जनी जनार्दन कोंदला ॥ २॥ आनंदें त्या आळ- विती । वोसमती हरिनामें ।। ३ ॥ निळा म्हणे देव चि झाले । भावा आले तयाचिया ॥ ४ ॥ ।। ६९८ ॥ कैसी सांपडली वेळ । तया केवळ लाभाची ॥ १ ॥ देव चि झाले चिनें चित्तें । गण गोते सहीत ।। २ ।। न ये चि विकल्पाचा वार । त्याचिया शरिरा अतळ ॥ ३ ॥ निळा ह्मणे पहाती तेथे । देवापरतें न देखती ॥ ४ ॥ | ॥ ६९९ ।। एक देव अनेक देव । नेणे चि भाव पालटों ।। १ ।। देव चि भासे धरामंडळ । सुक्ष्म स्थूळ महदादी ॥ २ ॥ अन्न जीवन भूक तहान । देव चि भोजन तृप्तीचें ॥ ३ ॥ निळा म्हणे अंगें मनें । जीवें प्राणे देव चि ॥ ७०० ॥ अपपरते नौलखती । अवघा चि वैखती विठ्ठल ॥ १ ॥