पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७५ ) क्रोधा लोभा शांती । कैसेनि होती मग याची ॥२॥ काळदंड चुकविता । कोण होता दवविण ॥ ३ ॥ निळा म्हणे मोकळा भक्तां । केरुनी ठेविती कोण पदीं ॥ ४ ॥ ॥ ६८७ ॥ कोण करते समाधान । देवावीण भक्तांचें ॥ १ ॥ ब्रम्ह- सनातन पावविता । कोण या होता भक्तांसी ॥ २ ॥ नाना कल्पनेच व्यसनें । तोडिनें बंधनें कोण सांग ॥ ३ ॥ निळा म्हणे जन्मजरा। यातना अधोरां न चुकत्या ॥ ४ ॥ | ॥ ६८८ ।। म्हणवीते शरणांगत । कोणाचे भक्त देवाचीण ।। १ ।। कोणापासीं । परिहार । देने संसारयानेचा ॥ २ ॥ कोण देवाविण येते । भक्तांसी सोडविते भयांतुनी ।। ३ ।। निळा म्हणे देव आणी भक्त। येरये होत साह्य सदा ॥ ४ ॥ ॥६८९॥ भक्त म्हणती अहो देवा । वियोग न व्हावा तुम्हां आह्मां ॥ १ ॥ इतुकेनि चि दोघे ही सुखी । मिसळतां एकएकी संतुष्ट ॥ २॥ आम्ही गाऊ तुमचे गुण । करावें श्रवण सादर तुम्ही ॥ ३ ॥ निळा म्हणे कमळापती । आहे हातीं तुमचे हैं ॥ ४ ॥ ॥ ६९० ॥ तुमची नामें गाऊ मुखें । तुह्मी तीं मुखें ऐकावीं ॥ १ ॥ नका यासी व्यवधान । मेळवा नयन नयनासी ॥२ ।। हाके सवें धांवोनि यावें । नुपेक्षावें सर्वथा ।। ३ ।। निळा म्हणे हृदयीं वास । करा सावकाश आमुचिये ॥ ४ ॥ ।। ६९ ॥ तुम्ही देवा कृपावंत । आम्ही अनाथ दुर्वॐ ।। १ ॥ म्हणी- नियां थोरपण तुम्हां । येते पुरुपोत्तमा आमुचेनि ।। ३ ।। समानपणे असतों तरीं । तुमची थोरी न दिसती ॥ ३ ॥ निळा म्हणे लोखंडे जैसा । दिधला परिसा वडिवार ।। ४ ।। | ॥ ६९२ ॥ तुमचे चरणी राहों मन । करा हे दान कृपेचें ॥ १ ॥ नाम तुमचे रंगो वाचा । अंगीं प्रेमाचा आयुभो ॥ २॥ हृदयीं तुमची राह मूतिं । वाचे कीति पवाडे ॥ ३ ॥ निळा म्हणे टेवा ठायीं । जीवभाव पायी आपुलीये ॥ ४ ॥ ॥ ६९३ ॥ भक्ती आराधिला देव । जाणवला भाव देवासी तो ॥५॥