( १७४ )
तुह्मी चित्ते सहज वाढविलें ॥ ३ ॥ निळा ह्मणे आपुल्या दासां । देतो
ऐसा वडवार ॥ ४ ॥
| ॥ ६८० ॥ भक्तां घरीचें करीन काम ! त्यांचेच नाम वागवीन ॥ १ ॥
भक्तरूपें विराजलों । स्थिरावलों हृदय त्या ॥ २ ॥ भक्तसुखें सुखावत ।
यांच्या चि क्रीडत देहसंगें ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसा देव । दाखवीं प्रभाव
आपुला ॥ ४ ॥
॥ ६८५ ।। भक्तावीण देवा कोण । सोयरा सज़न तिहीं लोकीं ॥ १ ॥
यालागीं त्याची च वाम पाहे । आज्ञेत राहे भक्तांचिया ॥ ३॥ आवडी
ऐसी रूपें धरी । भक्तांचे करी सांगितलें ॥ ३ ॥ निळा म्हणे लोकीं तिहीं।
भक्तांविण आप्त नाहीं देवा ॥ ४ ॥
|॥ ६८२ ॥ भक्ताविण देवालागीं । पुसतें जगीं कोण दुॐ ॥ १ ॥ नाम हि
नव्हतें रूप हि नव्हतें । कैसेनि जाणते कोण तया ॥ ३ ॥ परे हि परता पर-
देसी होता । केला भक्ती सरता आपुल्या वळे ॥ ३ ॥ निळा म्हणे तो
देव सा केला । भक्ति आणिला नामरूपा ॥ ४ ॥
॥ ६८३ ॥ देवावीण भक्तांचे संकट । कोण ते अरिष्ट निवारितें ॥ १ ॥
कोणासी शरण जाते तेव्हां । कळीकाळ जेव्हां आकळू येतां ॥२॥
संसार जेव्हां करितां ओदी । तडातोडी भंवताली ॥ ३ ॥ निळा ह्मणे तें
चुकविलें । अनर्थ वारिले कृपावंतें ॥ ४ ॥
| ॥ ६८४ ॥ देव नसतां भक्तांची विघ्नें । कोण जन्ममरणें निवारितें ॥ १ ॥
कोणासी म्हणते धांचा धांवा । करितां कुडावा कोण दुजा ॥ २ ३ कोण
नेता वैकुंठासी । आपुले विश्रांतीसी निज घरा ॥ ३ ॥ निळा ह्मणे देवा-
वीण । संसार बंधन न तुटते ॥ ४ ॥
| ॥ ६८८ ॥ चीन्यायशी लक्ष योनिमती । फेरे खाती यातना ॥ १ ॥ संक-
टापासुन सोडविता । कोण हो होता देवावीण ॥ २ ॥ निष्काम करुनी
ठेविता दासां । कोण होता ऐसा देवावीण ॥ ३ ॥ निळा ह्मणे निर्लोभ
शांती । कोण देता 'हाती भक्तांचिये ॥ ४ ॥
॥ ६८६ ॥ कैसेनि आकळते मन । देवावीण भक्तांचें ॥ १ ॥ काम
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/215
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
