( १६८ )
तुह्मी ॥ ३ ॥ निळा ह्मणे सजना जातीचा कसायी । रंका वंका ती हि
उद्धरिलीं ॥ ४ ॥
॥ ६४४ ॥ नरसिंह मेहता गुजराती ब्राह्मण । धरिला अभिमान त्याचा
तुह्मी ॥ १ ॥ द्वारकेसी त्याच्या हुंड्या भरियेल्या । सोभनासी नेल्या वखें
पेट्या ॥ २ ॥ जन जसवंत राय राजेश्वर । केला त्याचा थोर वहु-
मान ॥ ३ ॥ निळा ह्मणे कुबा कुलाल हरिभक्त । पीपा रजपुत प्रिय
तुह्मां ॥ ४ ॥
॥ ६४५ ॥ सुरदास आंधळी पंजाबी ब्राह्मण । गातां तुमचे गुण
वन्य झाला ॥ १ ॥ विसोबा खेचर चांगा वटेश्वर । नरहरी सोनार पाटक
नामा ॥ २ ॥ जिवलग तुह्मां सांगाती जीवाचे । विभागीं भाग्याचे केले
तुह्मीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे भेद नाहीं तुह्मां संतां । दाविली भिन्नता प्रीती-
साठीं ॥ ४ ॥
॥ ६४६ ॥ ह्मणउनि तुह्मां नित्य आठविती । या हो या हो ह्मणती
पांडुरंगा ॥ १ ॥ तुह्मी धांवोनियां येतां वरावरी । पुरवितां श्रीहरि आर्त
त्यांचें ॥ २॥ न माहे वियोग तुह्मां उभयतां । देवा आणि भक्ता एक
बंकी ॥ ३ ॥ निळा ह्मणे दोन्ही पिंड एक जीव । जाणती हा भाव निग-
पादक ॥ ४ ॥
| ॥ ६४७ ॥ अमृत गोडिये नाहीं भिन्नपण । प्रभा रविकीर्ण जया-
परीं ॥ १॥ अळंकार सोने काय ते वेगळे । डोळियां वुवळे वेगळिक ॥२॥
नभा अवकाशा कोण भिन्न करी । बखतंतुपरि देव भक्त ॥ ३ ॥ निळा
म्हणे प्राण तो चि प्रभंजन । नव्हती ते भिन्न एक एका ॥ ४ ॥
॥ ६४८ ॥ देव तो चि भक्त नाहीं वेगळक । जळगार उदक जयापरी
॥ १॥ येरयेरामाजि एकपण भिन्न । करुनी सौजन्य भोगिताती ॥ २ ॥
सौरभ्य चंदन परिमळ सुमन । नव्हती ते भिन्न एक एका ॥ ३ ।। निळा ह्मणे
रत्ना जेंचि रत्नकीळ । दोनांची निर्मळ एकी सिळा ॥ ४ ॥
॥ ६४९ ॥ तुह्मां आह्मां नित्ये भेटी । नाहीं तुटी कल्पांतीं ॥ १ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/209
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
