पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

॥ ६३७ ॥ संतरूपें तुह्मी चि धर । विश्वभरा अवतार ॥ १ ॥ ह्मणोनि महिमा कीती जगीं । वागविती अंगीं सामर्थ्य ॥ २॥ वोउनी रेडा चाल- विती भिती । विमानीं होती उपविष्ट ॥ ३ ॥ निळा ह्मणे मानवी तनु । जाती घेऊन वैकुंठा ॥ ४ ॥ | ॥ ६३८ ॥ अगाध कीर्ति वाढले संत । केलीं विख्यात चरित्रे ही ॥ १ ॥ अग्नीत उभे विष चि प्याले । नाहीं ते भ्याले महा शस्त्रा ॥ २ ॥ चंदनि आज्ञा बोले पशु । करी श्रुतिघोषु दीर्घ स्वरें ॥ ३ ॥ निळा ह्मणे ठेऊन उदक । कागद हि मेखी कोरड्या वह्या ॥ ४ ॥ | ॥ ६३९ ॥ आळी करितां नामदेव । जेविती स्वयमेव सांगाते ।। १ ।। सांव- त्याचे उदरीं वैसे ! पुंडलीका बसे दृष्टीपुढे ॥ २॥ कुम्यचिये धांचे भेटी । मेहत्या कंठीं माळ ओपी ॥ ३ ॥ निळा ह्मणे निर्जनवासी । संतोवामी न विसंवे ॥ ४ ॥ | ॥ ६४० ॥ तुकोबाचे कीर्तनमेळीं । नाचे कल्लोळी स्वानंदें ॥ १ ॥ खिरापती बाटी हालें । काला हि सांगातें करुं धांवे ॥ २ ॥ उदकामाजि रक्षी वह्या । अळिगी बाह्या पसरुनी ॥ ३ ॥ निला ह्मणे ऐशा कीर्ती । वादेवी श्रीपती दासांच्या ।। ४ ।। | ॥ ३४१ ॥ एकोवाची सेवा करी । वाहे घरीं जीवन ॥ १ ॥ गंधाक्षता तुळसीमाळा । पुरवी सोहळा करी ऐसा ॥ २ ॥ करुनी सडा १ मार्जन । पाळित वचन आज्ञेचें ॥ ३ ॥ निळा ह्मणे यापरि हरी । विराजे घरीं दासांचे ॥४॥ | ॥ ६४२ ॥ वैराग्याचा मेरु तो गोराकुंभार । तोडियले कर आणे- साठीं ॥ १ ॥ महाद्वारीं कथा श्रवण करितां । टाळी वाजवितां निघती नवे ॥ २॥ तुह्मी देवी कृपादृष्टी अवलोकिला । त्दृदयीं तो धरि पति- करीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे तुह्मां दासाचा अभिमान । अवतार ह्मणऊन धरणे लागे ॥ ४ । । ॥ ६४३ । केला प्रतिपक्ष आपुल्या अभिमानें । तोडिलीं बंधनें बहु- तांचीं ॥ १ ॥ जिहीं उच्चारिले अनुतापें नाम । त्यांचे मरणजन्म निवा- रिलें ॥ २ ॥ कोणीयें यातीचा हो कां कोणी एक । केलें कवतुक त्याचे