( १६१ )
एकी चि परी देवा भक्तां । बाधी वियोगाची व्यथा ॥ २ ॥ देव स्फुदे भक्त
रडे । एक पहाती एकाकडे ॥ ३ ॥ निळा म्हणे न सुटे मिठी । येरये
पडली गांठीं ॥ ४ ॥
| ॥ ६०३ ॥ पंढरिहुनी गांवा जातां । वाटे खंती पंढरिनाथा ।। १ ॥
आतां बोळवीत यावें । आमुच्या गांवा अम्हांसवें ॥ २ ॥ तुम्हांलागीं
प्राण फुटे । वियोगदुःखें पूर लोटे ॥ ३ ॥ निळा म्हणे पंढरिनाथा । चला
गांवा अमुच्या आतां ॥ ४ ।।
॥ ६०४ ॥ देव चालिला सांगातें । भक्त जाती ज्या ज्या पंथें ॥ १ ॥
परम आनंद उभयतांसी । देवभक्तां सुखाच्या रासी ॥२॥ चालतां मारगीं ।
कथा कीर्तन प्रसंगीं ॥ ३ ॥ निळा म्हणे देवभक्त । परम विश्रांती
चालतां ॥४॥
| ॥ ६०६ भक्तांचिया गांवा आला । देव परमानंदें धाला ॥ १
म्हणे नवजाये येथुनी । आतां भक्तांमी टाकुनी ॥ २॥ सिण माझा हरला
भाग । गोड वादे याचा संग ।। ३ ।। निळा म्हणे विजयी झाले । देवा भक्त
घेउन आले ॥४॥
|॥ ६०६ ।। यात्रेहुनि आले गांवा । घेउनियां विठ्ठल देवा ॥ १. ।। भक्त
पूजिती आदरें । दाळ विणे मृदंगस्वरें ॥ २ ॥ दिड्या पताका छविने ।
नृत्य हरिकथा गायनें ॥ ३ ॥ निळा म्हणे निज भुवनीं । पूजिती स्तचिती
अनुदिनीं ॥ ४ ॥
| ॥६०७ ॥ देव घरा आला । भक्ति सन्मानें पूजिला ॥ १ ॥ पाहुणोर
पंगती । संत द्विजवंदं शोभती ॥ २ ॥ पुढे आरंभुनी कथा । बुके माळा
गंधाक्षता ॥ ३ ॥ निळा म्हणे ब्रम्हानंदें । नाचती उभयतां आनंदें ॥ ४ ॥
| ६०८॥ देव आदरें म्हणे भक्तां । घ्या हो भुक्ति मुक्ति आतां ॥१॥
भक्त म्हणती नेघो देवा । पुरे आम्हां तुझी चि सेवा ॥ २ ॥ रिद्धी सिद्धी
तरी घ्यारे । भक्त सागिती धिःकारें ।। ३ ।। निळा म्हणे करुनी साटी ।
वैसले चरण घालुनी मिठी ॥ ४॥
॥ ६०९ ।। भक्त पहावया तांतडी । नाम.चि ऐकोनि घाली उडी ॥
21 .
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/202
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
