पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/201

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

| ॥ १५९६ ॥ धांचीनियां झोंबे कंठीं । कृपादृष्टि अवलोकी ।। १ ।। म्हणे श्रमलेती माग येतां । बैंसा आतां अविश्रम ॥ २॥ घडीघडी जिविंची मात । सांगे पुसे आर्त आवडीचें ॥ ३ ॥ निळा म्हणे कृपाघनें । बहुत मानें गारविलें ॥ ४ ॥ | ॥ ५९६ ॥ पुसे क्षेम भक्तांलागीं । म्हणतसे मार्गी श्रमलेती ।। १ ।। प्रति वरुप भेटी देतां । सांभाळितां येउनी ॥२॥ नाहीं तुमचे उत्तीर्ण झालों । कधी अलों गांवासी ॥ ३ ॥ निळा म्हणे आभारला । प्रसन्न झाला दासासी ॥ ४ ॥ ॥५९७॥ म्हणे मी येईन तुम्हांसवें । गांवा न्यायें आपुलिया ॥ १ ॥ठाकेल ते करीन सेवा । माझा न करावा अव्हेर ॥२॥ राहेन तुमचिये संगतीं । सुख विश्रांती कारणे ॥ ३ ॥ निळा म्हणे येणे रूपा । तुमची कृपा देव म्हणे ॥४॥ ॥ ५९८ ॥ भक्त सेवेच्या उपकारें । बहुत अभारें दाटलों ॥ १॥ काय उत्तीर्ण व्हावे यासी । रुक्माईसी विचारी ॥ २॥ देतां कांहींच न घेती । उदास वृत्ती सर्वदा ॥ ३ ॥ निळा म्हूणे जिव चि जडलें । तिहीं मजे केले अंकित ॥ ४ ॥ ॥ ५९९ ॥ मज हि भीड नुलंघवे । जे त्या पुसावें मनोगत ॥ १ ॥ सर्वही भावे सेवाऋणीं । मजचि करुनी सोडियलें ॥ २॥ आशा मात्र नाहीं यासी । जे कां देहामी नाठविती ॥ ३ ॥ निळा ह्मणे घातली मिठी । कल्पकोटी न मुटेसीं ॥ ४ ॥ | ॥ ६०० ॥ देतां कांहीं चि न घेती । भुक्ति मुक्ति रिद्धी सिद्धी ॥ १ ॥ म्हणोनियां संकट थोर । वाटे दुस्तर मज यांचें ॥ २ ॥ वैकुंठासी नेऊ म्हणतां । विटती तत्वतां ऐकोनी ॥ ३ ॥ निळा म्हणे रंगले रंग । माझिया निजांग लिगटले ॥ ४ ॥ ॥६०१ ॥ निरोप मागावया संत । आल राउळा समस्त ॥ १ ॥ चरणी ठेऊनियां माथा । विनविती पंढरिनाथा ॥२॥ म्हणति कृपा अस द्यावी । उपेक्षा आमची न करावी ॥ ३ ॥ निळा म्हणे पंढरिनाथा । वियोग न साहे। सर्वथा ॥ ४ ॥ । ६६ । सहादत झाले कंठ | नेत्र अश्र "चालती लोट ॥ १ ॥