( १५९ )
भिऊ नका । माझिया सेवकां भय नाहीं ॥ २ ॥ नाम मुखीं न संडावें ।
भजा भावें संतांसी ॥ ३ ॥ निळा ह्मणे ऐसी हरी । आज्ञा करी
निज दासां ॥ ४ ॥
॥ ५८९ । निर्भय असा माझ्या बळें । कळिकाळे ते रंके ॥ १ ॥ सुखें
करा हरिची कथा । तुमची चिंता मज आहे ॥ २ ॥ पाचाराल ते चि घड़ी।
येइन तांतडी धांवत ॥ ३ ॥ निळा म्हणे अमृतवचनें । दे वरदानें
दासांसी ॥ ४ ॥
| ॥ ५० ॥ सोडुनी तया न वचे दुरी । त्याचा करी प्रतिपक्ष ॥ १ ॥
म्हणे मी सांचा ते ही माझे । नव्हती दुजे कल्पांती ॥ २ ॥ मी तू म्हणतां
वेगळे न हो । मुलींचे आहों एकएकीं ॥३।। निळा म्हणे देवभक्तां । एकात्मता
शायीची ॥ ४ ॥
॥ ५९१ ॥ स्वामी एक म्हणवी दास । आवडीस रूप केलें ॥ १ ॥
मुळीचे दोघां एकपण । परी में भिन्न दाखविले ॥ २॥ एक म्हणे धांवा
धांचा । एक कुडावा करी याचा ॥ ३ ॥ निळा म्हणे नवल वाटे । साने
मोठे नव्हती हे ॥ ४ ॥
॥ ५९२ ॥ एक वैसे सिंहासनीं । कर जोडुनी एक उभा ।। १ ।। एक
पूजा स्वीकारित । एक करित निजांगे ॥ २॥ मुळीं पाहतां दोघे एक }
परी कौतुक दाखविलें ॥ ३ ॥ निळा म्हणे सेवक स्वामी । पुरुषोत्तम
में मिथ्या ॥ ४ ॥
| ॥ ६९३ ॥ वोलिलों में क्षमा करा । विश्वंभरा अपराध ।। १ । सेवकांनी
कीजे सेवा । तुम्ही तों देवा देवो चि॥ २॥ चावललों ते सलगी केली । उपमा-
हिली पाहिजे ॥ ३ ॥ निळा ह्मणे न कळे लीला । अकळ कळा तुमची
॥ ५९४ ॥ प्रवेश राउळाभीतरीं । केला संतमुनेश्वरीं ॥ १ ॥ तंव तो
घननीळ सांवळा । उभा विटेवरी देखिला ॥ २ ॥ कांसे मिरचे पीतांवर ।
विराजित कट कर ॥ ३ ॥ मुख सुहास्य चांगलें । केशर निर्दली रेखिलें
॥ ४ ॥ अंग प्रत्याग भूपणें । दिव्य माळी, करकंकणे ॥ ५ ।। निळा
म्हणे संत भेटी । उताळ घाली मिठी ॥ ६ ॥
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/200
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
