पान:तर्कशास्त्र.pdf/97

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. ጻ8

  • १८१६ सालांतील नेपोलियन बेोनापार्ट' व 'हतभागी' या दोन वस्तूंची तुलना करून यांत ऐक्य आहे असें आपण ठरवितों. जर आपण १८०८ तील नेपोलियना विषयीं बोलत असू, तर त्याचें 'हतभागी' या वर्गाशीं ऐक्य नाहीं असें दिसेल.

४. ज्यानां रीतिदर्शक वाक्यें ह्मणतात, ह्मणजे ज्या वाक्यांतील विधेय फक्त क्रियाच दर्शवित नसतें, तर ती ज्या विविक्षित रीतीनें घडली ती रीतिही दर्शवितें, त्या वाक्यांचीही बहुतेक तर्कशास्रकार अशीच व्यवस्था लावितात, जर्से, ' शिवाजीनें अफजुलखानास न्यायानें मारिलें' या वाक्यांत ‘अफजुलखानास मारणारा' एवढेच विधेय आपणास समजतां कामा नये, तर 'अफजुलखानास न्यायार्न मारणारा' इतकें विधेय समजले पाहिजे. ६. वाक्यांतील दोन पदांमध्यें ऐक्य आहे किंवा भेद आहे हैं जै सांगर्ण त्यालाच वाक्याचा भाव अर्स ह्मणतात. 'भावा' च्या संबंधानें वाक्याचे दोन प्रकार झाले आहेतः विधिरूप व निषेधरूप. ह्मणजे प्रत्येक वाक्य उद्देश्य व विधेय यांत ऐक्य आहे असें तरी सांगतें किंवा भेद आहे असें तरी सांगतें. [ न्यायशास्त्रांत अभावात्मक ह्मणजे निषेधरूप सिद्धांत मुळींच येत नाहीत. संस्कृत न्यायशास्त्रांतील विधायक नेहमीं 'अस्ति' हें असतें, 'नास्ति' अर्से कधींही नसतें, अभावात्मक सिद्धांताविषयी बेोलावयाचें असल्यास नैयायिक विधेयास अ हें उपपद जोडून, विधायकास भाव