पान:तर्कशास्त्र.pdf/96

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

&乙 तर्कशाख्. विस्तृत केलें असतां 'गाय हंबरणारी आहे ? असें होतें, हीं तीन पर्दे ओळखावयाची असल्यास, आपणांस कवळ शब्दांवर दृष्टि देतां कामु नये, तर त्यांपासून आपणास ज्ञान काय होतें हेंच पाहिलें पाहिजे. 'अज्ञजनानां उपदेश करण्याकरितांच रामदासस्वामींनीं अवतार घेतला, हैं ह्मणणें योग्य व सर्वांस ग्राह्य होण्याजोर्गे आहे,' या वाक्यानें ज्या दोन पदार्थीचें ज्ञान होतें, त्यांवरून पाहलें असतां या वाक्यांतील दोन पर्दे ही आहेतः 'अज्ञजनांना उपदेश करण्याकरितां रामदासस्वामीनीं अवतार घेणें ' हैं एकू, व 'येोग्य व सर्वांस ग्राह्य होण्याजेॉर्गे झाणणें' हैं दुसरें. था दोन ज्ञानांची मनांत तुलना केलेली आहे, व शेवटीं त्या दोहोंत ऐक्य आहे असें ठरविलें आहे. ३. तर्कशास्त्रज्ञ 'असणें ? या धातूच्या वर्तमान कालवाचक रूपानें-ह्मणजे ‘ आहे. 'किंवा ' नाहीं' 'आहेत' किंवा 'नाहीत? या शब्दानें - बहुधा विधायकपद दर्शवितात. परंतु अशा ठिकाणीं । आहे ? हैं पद एकाद्या सामान्य क्रियापदाप्रमाणें क्रियावाचक आहे असें मात्र समजतां कामा नये. ' विधायक ? हा एक अमूर्त पदार्थ आहे, व ती ऐक्य आहे किंवा भेद आहे हें दर्शविण्याहून कमी किंवा जास्ती कांहींही करीत नाहीं. वाक्यांत,विधायकपदाखेरीज इतर सर्व पदांचा उद्देश्यांत किंवा विधेयांत समावेश केला पाहिजे. विधानांत कालदर्शक जो भाग आला असल तेी विधायकाला जोडतां कामा नये. * नेपोलियन बोनापार्ट १८१५ त हतभागी होता' या वाक्यांत ज्या देोन वस्तूंची तुलना केली आहे त्या ह्या:-