पान:तर्कशास्त्र.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. ६७ उद्देश्य असें ह्मणतात. उद्देश्याची ज्या दुस-या वस्तृशीं तुलना केलेली असते त्यास विधेय असें ह्मणतात व ऐक्य आहे किंवा नाहीं हें दर्शविणा-या पदास विधायक. असें म्हणतात. विधानांत एकंदर तीन किंवा अधिक शइ असू शकतील, कधीं कधीं दोन किंवा एकच शठ्ठ असू शकेल. 'आप्पलपेोटेपणा निंद्य आहे? या वाक्यांत उद्देश्य, विधेय व विधायक हीं प्रत्येक एक एक शइांनींच व्यक्त केली आहेत. परंतु अशाही कांहीं भाषा आहेत कीं, त्यांत सर्व विधान एका शब्दानेंच सांगतां येईल, जर्से 'गच्छति..? या विधानाचे तीन भाग निराळे करून दाखविणें झाल्यास आपणास असें म्हटलें पाहिजे: स: गच्छन् अस्ति, तो जाणा-यापैकी एक आहे. हेंच वर्तुळानें खालीं दाखविलें आहे. वाक्यांतील अकर्मक क्रियापदें सामान्यतः विधेय व विधायक हीं दोन्हीं दर्शावतात. जर्से, ‘ गाय ' हबरते ? या वाक्यांत 'हंबरते ' या एकाच शब्दानें विधेय व विधायक हीं दोन्हीं सांगितलीं जातात. व हेंच वाक्य