पान:तर्कशास्त्र.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग दुसरा. --O-O- विधान ( व्याप्तिज्ञान ). १. तर्कशास्त्रज्ञांनीं विधानाचें लक्षण · ज्या दोन वस्तूंचें किंवा कल्पनांचें आपणास ज्ञान झालें आहे त्या दोन वस्तूंची किंवा कल्पनांची परस्परांशीं मनामध्यें तुलना करणें, व त्या दोहोंत ऐक्य आहे किंवा नाहीं हैं सांगणें ? असें सांगितलें आहे. जर्से, ' शिवाजी शूर होता ' असें जेव्हां आपण ह्मणतो तेव्हां ' शिवाजी? व ' शूर लोक? या दोन पदार्थीचें आपणास ज्ञान झालें आहे, असें. समजून त्या दोहोंची परस्परांशीं तुलना करित, व शेवटीं त्या दोहोंत ऐक्य आहे असें ठरवितों. तसेंच शिवाजी विद्वान् नव्हता ' या विधानांत आपण ' शिवाजी ' व ' विद्वान लोक ” या दोन ज्ञानांची तुलना करून त्या दोहांत ऐक्य नाहीं असें ठरवितों. ह्मणजे ' शूर लोक? या वर्गात शिवाजी ' ही व्यक्ति येते, व ती ' विद्वान लोक ' या धगीत येत नाहीं असें आपण ठरवितों. हींच विधानें वर्तुलांनीं स्पष्ट करून खालीं दाखविलीं आहेत. व याप्रमाणें प्रत्येक विधान वर्तुलांच्या योगानें मांडण्याची संवय विद्यार्थ्यांनीं एव्हांपासून ठेवावी, म्हणजे या पुढील सर्व भाग त्यांना सुलभ । रीतीनें समजेल,