पान:तर्कशास्त्र.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

R आहे. अर्वांचानकाळी गौतमकृत न्यायसूत्रांवर विश्वनाथानें एक स्वतंत्र वृत्ति केली आहे. याशिवाय न्यायसूत्रांशीं किंवा त्यावरील कोणत्याही टीकेशीं ज्यांचा प्रत्यक्ष संबंध नाहीं, असे या विषयावर अनेक संस्कृत ग्रंथ झाले आहेत. यापैकीं अन्नंभटकृत तर्कसग्रह, लँगक्षिभास्करकृत तर्ककॅौमुदी, व केशवमिश्रकृत तर्कभाषा, हे तीन्हीं ग्रंथ लहान व सोपे असल्याकारणानें विद्यार्थी हेच प्रथम पढतात.

  • R, ir-N

या तिहींपैकीं कोणता तरी एक प्रथम शिकल्यानंतर भाषापरिच्छेद व त्यावरील सिद्धांतमुक्तावलि ही टीका यांचा अभ्यास करितात. इंग्रजी तर्कशास्त्रावरील आजपर्यंतचे प्रसिद्ध ग्रंथकार अरिस्टाटल (ग्रीक), क्यांट (जर्मन), व्हेटले, ह्यामिलटन व मिल्ल हे आहेत. प्रोफेसर म्याक्समूलर यांनीं आपल्या न्यायशास्त्रावरील ग्रंथांत असें लिहिलें आहे-ब हैं मत हल्छीं सर्वमान्य झालें आहे-कों ' तर्कशास्त्र व व्याकरणशास्त्र ही शात्रे फक्त हिंदू व ग्रीक या दोनच राष्ट्रांनीं प्रथम शोधून काढिलीं, असें सांप्रतच्या इतिहासावरून अनुमान करितां येतें, ? श्रीमंत आण्णासाहेब कुरुंदवाडकर यानां १८९५ सालीं भेकॉंशकृत 'धि लॉज ऑफ डिस्कर्सिव्ह थॉट” हें पुस्तक शिकवीत असतांनां या पुस्तकाचे आधारें मराठींत एक पुस्तक लिहावें ही कल्पना माझ्या मनांत प्रथम आली. वरील इंग्रजी पुस्तक अलाहाबाद युनिव्हर्सिटीच्या पहिल्या बी. एच्या परिक्षेस नेमिलेलें आहे. आजपर्यंत माझ्या अवलोकनांत आलेल्या इंग्रजी तर्कशास्त्रावरील इतर ग्रंथांपेक्षां वरील ग्रंथांत सर्व विषयाची माहिती अधिक व्यवस्थेशीर व थोडक्यांत दिलेली आहे असें आढळल्यामुळे सदर ग्रंथाचाच आधार घेण्याचें मी निश्चित केलें. शेोधाअंतीं औाजेपर्यंत मराठींत लिहिलेलीं तर्कशास्त्रावरील पुस्तकं आढळलीं तीं:-