पान:तर्कशास्त्र.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

?乐 तर्कशास्त्र, अभावात्मक ज्ञान. ४२. पदार्थात एक 'विशिष्ट चिन्ह' असल्यानें त्यांची एक जाति होते हैं आपण पाहिलैंच आहे. परंतु ज्या पदार्थात तें ‘विशिष्ट चिन्ह नहीं अशा पूदार्थीचीही आपणास एक जाति करितां येईल. उदाहरणार्थ, आपण असें ह्मणतों कीं । सर्ध चतुष्पाद प्राणी पृष्ठवंशयुत आहत,? व ज्यानां पाठीचा कणा नाहीं ते प्राणी अपृष्ठवंशयुत आहेत. यापैकी पहिल्यास भावात्मक ज्ञानू ह्मणतात व दुस-यास अभावात्मक ज्ञान ह्मणतात. तकशास्त्रज्ञ अस ह्मणतात कीं, एक भावात्मक जाति व एक अभावात्मक जाति अशा दोहींत मिळून या जगांतील सर्व पदार्थीचा समावेश होती. जर्से, सर्वे पदार्थ पृष्टवंशयुत किंवा अपृष्टवंशयुत या दोहीपैकीं कोणत्या तरी एका कोटींतील असलेच पाहिजेत. परंतु याचा सरळ अर्थ पाहिला तर एवढाच होतो कीं, प्रत्येक पदार्थात एक विवक्षित गुण असला पाहिजे किंवा नसला पाहिजे. तो गुण ज्यांत नाहीं अशा सर्व पदार्थीची एक जाति करएयाकरितां, त्या गुणाचा अभाव हैंच योग्य ‘विशिष्ट चिन्ह आहे असें मात्र समजतां कामा नये. पाठीचा कणा ज्यांस नाहीं अशा आत्मा, विचार, प्रामाणिकपणा, पोशाक, नक्षत्र इत्यादि सर्व पदार्थाची ' अपृष्ठवंशयुत ' अशी एक जाति करण्यांत कांहींच फायदा नाहीं. ' प्राणि' या * पर? जातींतील कांहीं भाग 'पृष्ठवंशयुत' प्राण्यांहून भिन्न आहे एवढ् दाखविण्यापुरताच ' अपृष्ठवंशयुत' या संज्ञेचा उपयोग करावा. हैं एक ध्यानांत ठेवण्याजोर्गे आहे की,