पान:तर्कशास्त्र.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. · :: 8ኳ सुमूजलें पाहिजे. हैं कसें तें खालील आकृतीवरून स्पष्ट w a "S" - होईल. याचें अधिक विवेचन तिस-या भागांत येईल. ४१. परंतु ज्ञानाचे असे किती जरी प्रकार असल तरी सरतेशेवटीं प्रत्येक ज्ञान ( १) व्यक्तिज्ञान (२) जातिज्ञान किंवा ( ३) गुणज्ञान यपैिकीं एका प्रकारचें असलैंच पाहिजे. अर्थाची चूक होऊं नये व विचारांचा घोंटाळा होऊं नये याकरितां, प्रत्येक ज्ञान यांपैकीं कोणत्या प्रकारचें आहे हें आपणास ओळखतां येणें फार महत्वाचें आहे. 'कालिदासाचीं नाटकें संस्कृत भाषेत सर्वांत उत्तम आहेत ? या वाक्यांत ' कालिदासाचीं नाटकें ' हैं समुदायात्मक व्यक्तिज्ञान आहे व 'संस्कृत भार्षत सवीत उत्तम ? हैं गुणज्ञान आहे. 'तर्कशास्त्र हें अनुमानविषयक विचारांच्या नियमांचें शास्त्र आहे' या वाक्यांत 'तर्कशास्त्र' व अनुमानविष्यक विचारांच्या नियमांचें शास्त्र' ही दोन्हीं गुणज्ञानें आहेत. 'दु:खितांचीं अंतःकरणें फत्त प्रेमानेंच शांत होण्याजोगी आहेत' या वाक्यांत ‘दु:खितांची अंतःकरणें' व 'फत प्रेमानेंच शांत होण्याजोगीं । हीं दोन्हीं जातिज्ञानें आहेत।