पान:तर्कशास्त्र.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग घहिला. या सर्वांना पाठीचा कणा आहे ह्मणून ' पृष्टवंशयुत ' प्राणी असा या सर्वांचा एक वर्ग करितां येईल. याप्रमाणें वर ' वर चढत गेल्यास आपण ‘ भूत (अमलेलें)' या वर्गापर्यंत वेऊन पोहोंचू. 'भूत ? हा वर्ग अस्तिवाशिवाय दुसरा कोणताही गुण दर्शवीत नाही. एकाहून एक उच्च अशी वर्गीकरणें होण्याचें कारण हेंच आहे कीं, जसा प्रत्येक व्यक्तींत एक गुणसमुचय असतो तसा जातीमध्येंही असूं शकतो. ' भूत' या वर्गापर्यंत आपण येऊन पोचलों ह्मणजे जातिवाचक द्रव्यापासून निघून जातिवाचक गुणापर्यंत आपण येऊन पोचलों असें झालें. मिश्रज्ञान. - ३९. प्रत्ये ज्ञान तिहींपैकीं एका प्रकारचें असतें हें वर सांगितलेंच आहे, परंतु या तिहींचें एकमेकांशीं मिश्रण होऊन आणखीही कांहीं प्रकार होतात. जसें, ( १ ) जातिनिर्दिष्ट व्यक्तिज्ञान हा एक प्रकार आहे. याचें उदाहरण, ' तो कवि ' ' तो वक्ता ' ' तो सेनापति ' ' तो तत्ववेत्ता.” हीं सर्व व्यक्तिज्ञानें आहेत परंतु या प्रत्येक व्यक्तीनें एका वर्गातील आपण आहों असें दर्शविलें आहे. (२) शुद्ध व्यक्तिज्ञान ह्मणजे ज्याला व्याकरणांत विशेषनाम म्हणतात तो दुसरा प्रकार. जसें बाजीराव बल्लाळ, नाना फडणवीस, बाळ गंगाधर इत्यादि. (३) समुदायात्मक व्यक्तिज्ञान हा एक तिसरा प्रकार आहे. जर्से, ' छपवावी पलटण? (हें व्यक्तिज्ञान असून हो, या पलटणींतील सर्व शिपायांचा त्यांत समावेश होतो), ' प्रतिनिधींची सभा ? (हैं नांव प्रत्येक सभासदास लागूं शकणार नाही, परंतु