पान:तर्कशास्त्र.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

くz . {ስጓኾ&ff S'... जेव्हां तें गुणज्ञान. एखाद्या गुणाविषयींच असेल, तेव्हां एक किंवा अनेक पदार्थीचा गुण य नात्यानेच त्याला अस्तित्व आह असें समजावें. यावरून ८. दुसरा नियम-जर् द्रव्याला अस्तित्य असेल तर गुणालाही अस्तित्व आहे. हा नियम ठरवितांना, गुणावधारण किंवा निष्कर्ष योग्य रीतीनें केलेला आहे असें प्रथम धरून चाललें पाहिजे; ह्मणजे वस्तूच्या ज्या भागाविषयीं किंवा गुणविषयीं आपण विचार वरीत आह, तो भाग किंवा तो गुण त्या वस्तूंत खरोखर दृश्यमान असला पाहिजे. एखाद्या कमलाच्या श्रेतपणाबद्दल जर आपण विचार करीत असलों, तर तें कमल खरोखर श्रेतवर्णच असलें पाहिजे, अशा रीतीर्न मुख्य पदार्थाला जर अस्तित्व असेल तर त्या पदार्थाच्या ज्या गुणाविषयीं आपण विचार करूं त्या गुणासही अस्तित्व असलेंच पाहिजे. आतां तो पदार्थच जर केवळ काल्पनिक असेलउदाहरणार्थ दशमुखी रावण-तर केवळ कविकल्पनेखेरीज इतर ठिकाणीं या दहा मुखांना अस्तित्व आहे असें आपणांस ह्मणतां येणार नाहीं. परंतु एखादा मुखासहित सजीव मनुष्यप्राणी आपणापुढें उभा ठाकलेला जर दिसेल तर आपणास असें खात्रीनें सांगतां येईल कीं त्या मुखाला अस्तित्व आहे व तें धारण करणा-यालाही अस्तित्व आहे, आणि जर तें मुख सुंदर असेल तर त्या सैौंदर्याला देखील अस्तित्वू. आहे. र्भ:माच्या शरेिणूपासून भीमुाचें वृल मूनामध्य मृला वेगळे करितां येईल. परंतु तें शरीर केवळ काल्पनिक आहे ह्मणून त्याचें बलही काल्पनिकच