पान:तर्कशास्त्र.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग पहिला. ११ ‘उडत' व 'जाणारा' हे दोन्ही गुणवाचक शब्द होत. आपणास कीणर्तही ज्ञान झाल्यानंतर, तें कशाचें ज्ञान होत आंह व तें कोणत्या प्रकारचें आहे हें ओळखावयाचें असल्यास, केवळ शब्दांकडे दृष्टि न देतां, आपल्या मनांत कोणता विचार व कोणती कल्पना पुढें उभी राहत इकडेच लक्ष दिलें पाहिजे. ३. ज्या मार्गनीं आपणास ज्ञान होतें, ल्यांवरून ज्ञानाचे 'प्रत्यक्षज्ञान, व ‘ अनुमानजन्यज्ञान' असे दोन भाग आपण पूर्वी केले आहेत. आतां ज्या विषयांचें ज्ञान होतें त्यांवरून ज्ञानाचे द्रव्यज्ञान व गुणज्ञान असे दोन भाग करितां येतात. जसें । घट' व 'काळेपणा'. द्रव्यज्ञानाचे पुन्हा दीन विभाग होतात. ते असे:-जातिज्ञान व व्यतिज्ञान. जसें 'शास्त्रज्ञ' व 'इंद्र'. ह्मणजे विषयाच्या संबंधानें ज्ञानाचे एकंदर तीनच भाग झाले; ते असे:- जातिज्ञान, व्यक्तिज्ञान व गुणज्ञान. तर्कशास्त्र शिकतांना, ज्ञानाच्या वर सांगितलेल्या तीन प्रकारांपैकीं प्रत्येक प्रकाराचें खरें स्वरूप व त्या प्रकारांमधील परस्पर भेद आपणांस चांगला समजणें हें अत्यंत महत्वाचें आहे. ज्याप्रमाणें ज्ञानाचे त्याप्रमाणें पदांचेही जातिवाचक, व्यक्तिवाचक व गुणवाचक पद असे तीन भाग करतां येतात. ज्ञानाचे व पदांचे मुख्यभाग व पोटभाग कसे होतात हैं पुढील आकृतीवरून स्पष्ट होईल,