पान:तर्कशास्त्र.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

c g त्,न?३Iस्त्र. ताडाचें व अंजिराचें झाड पहाण्यावरोबर आपण असें सांगू शकतों कीं, त्यांपैकी पहिल्या झाडाच्या पानाच्या । शिरां सरळ रेषेत आहेत, व दुस-या झाडाच्या वर्तुलाकार आहेत. परंतु याशिवाय इतर गोष्टींमधील समानता किंवा असमानता, केवळ वस्तुज्ञान होण्याबरोबरच आपणास कळणार नाही. उदाहरणार्थ, ताड व अंजीर या दोन झाडांकडे नुसतें पाहूनच ती एकूदळापासून कीं द्विदळापासून उत्पन्न होतात, व ती गर्भातून वाढतात, - कीं बाहेरून नव्या नव्या वेष्टणाच्या रूपानें वाढतात, हैं निश्चयार्ने सांगतां येणार नहीं. परंतु ताडाच्या पानाच्या शिरा सरळ रेषेत आहेत, व अंजिराच्या वर्तुलाकार आहेत, हें आपण सहज पाहूं शकतों. आणि असें समजा कीं, सरळ शिरांचीं झाडें एका दळापासून उत्पन्न होतात, व ती गर्भातून वाढतात; तसेंच वर्तुळ शिरांचीं झांडें द्विदळापासून होतात व तीं बाहेरून वेष्टणानें वाढतात, हें आपणास पूर्वीच माहीत आहे. आतां युा गोष्टींपासून आपणास एक अनुमान काढतां येण्याजेोर्गे आहे. तें असें कीं, या ताडवृक्षाच्या शिरा सरळ गेलेल्या आहेत, यावरून ते एका दळापासून उत्पन्न होत असावा. व या अंजिराच्या शिरा वर्तुलाकार आहेत, यावरुन अंजिराचें झाड द्विदळापासून उत्पन्न होत असावें. ही अनुमानें करितांना, पूर्वीच्या दोन वस्तूंच्या ज्ञानाशिवाय तिस-या एका ज्ञानाची आपणांस गरज लागली. तें एकदळ व द्विदळासंबंधानें ज्ञान होय. या मकारालाच अनुमान असें ह्मणतात.