पान:तर्कशास्त्र.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्वात. ३ मनुष्यास कोणताही पदार्थ ओळखण्याची, त्याविषयीं विचार करण्याची व त्यावरून कांहीं अनुमान काढण्याची शक्ति पूर्वीचीच आहे असें धरून चाललें पाहिजे. व या तीन प्रकारच्या क्रियेसंबंधीं जे नियम आढळून येतात त स्पष्ट करून दाखावण्यापुरताच काय ता तकशास्त्राच। उपयोग आहे. आणि ज्याप्रमाणें व्याकरणशास्त्रांतील नियमांच्या साहाय्यानें आपले विचार दुस-यास शुद्धरीतीनें । कळवितां येतात, त्याचप्रमाणें विचाराविषयीं तर्कशास्त्रांत ठरविलेल्या नियमांच्या साहाय्यानें आपणास शुद्धरीतीनें विचार कारितां येती. ३. तर्कशास्त्राचा मुख्य विषय * विचार' हा होय. व यांत ‘भाषा' ही केवळ अप्रधान आहे. यावरून हें स्पष्ट होतें कीं, व्याकरणशास्त्र, अलंकारशास्त्र व भाषाशास्त्र था सवीपासून तर्कशास्त्र हैं अगदीं भिन्न आहे. कारण या तीन्ही शास्त्रांचे सामान्य विषय भाषण, लेखन व भाषा हे तीन्ही होत. ४. आतां रोजच्या व्यवहारांतील कांहीं अनुमानात्मक वुद्धिव्यापारांचा विचार करूं, आपल्यापुढें एक बर्फाचा तुकडा आहे असें समजा. जोपर्यंत त्याजकडे आपण साहजिक रीतीनें पाहतें आहॉ, ह्मणजे जॉपर्यंत आपणास त्याच्या आकाराचा व रंगाचाच बोध होत आहे, तोंपर्यंत त्यासंबंधानें बुद्धिव्यापार कोणताच होत नाही. पुढे आपणांस त्याचा आकार व रंग यांमधील भेद जाणतां येईल. किंवा त्याचा ढिसूळुष्णा, शांतता, प्रश्रद्र्शकता इत्यादि गुण मनांत आणतां येतील. परंतु यावेळीं मात्र