पान:तर्कशास्त्र.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-o-o-o-o-Hi या शास्त्राची व्याख्या व पोटभf. १. ज्ञान हें दोन प्रकारचें आहे: प्रत्यक्षज्ञान व अर्जु मानजन्यज्ञान. फक्त डोळे, जिव्हा, कृान, नाक व पशू या पांच इंद्रियांनीं होणारें जें ज्ञान तें प्रत्यक्षज्ञान, जर्से * आकाशांत काळे ढग आले आहेत ? हा बदाम कडू आहे', 'कोकिळेचा आवाज मंजुळ आहे', 'या फुलास वास नाहीं ? किंवा ‘ ही गादी मऊ आहे', हैं प्रत्यक्षज्ञान होय. हें ज्ञान होण्यास बुद्धीची अगर विचारशक्तीची मुळीच गरज लागत नाही. परंतु याप्रमाणें एखाद्या गेोष्टीचें प्रत्यक्षज्ञान झाल्यानंतर त्यापासून विचारशक्तींच्यू साहाय्यानें आपणास जें एक निराळें ज्ञान प्राप्त होतें त्यास अनुमानजन्य किंवा संक्षेपर्ने अनुमान अर्स ह्मणतात. उदाहरणार्थ, 'आकाशांत काळे ढग आले आहेत' हैं पाहून आतां 'पाऊस पडेल' असें आपण सांगू शुकर्ते. ह्मणजे १. 'जेव्हां जेव्हा आकाशांत काळे ढग येतात तेव्हां तेव्हां पाऊस पडतो', व २. 'हीं आकाशांत काळे ढग आले आहेत ’, हे दोन सिद्धांत आपणास अवगत झाले असले ह्मणजे त्या दोहोंचा संयोग करून ‘ आतां पाऊस पडेल' हा एक तिसरा सिद्धांत आपणास काढतां येतो, त्याप्रमाणें दोन सिद्धांतांचा संयोग करून