पान:तर्कशास्त्र.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. 、C& वरून सामान्य नियम शोधून काढिलेलें असतात. परंतु आपणास एक नवीन नियम सांपडला असें म्हणतां यष्यास, किती व कोणत्या प्रकारचें अवलोकन पुरें आहे, हा एक महत्वाचा प्रश्न राहतो. एक जण असें r - a अनुमान करतो:-तीन शुक्रवारी मी तीन निरनिराळे va e veM لاگ-۵ھ----- --۔ vN sa बेत केले, व त्यांपैकीं माझा प्रत्येक बेत फसला; यावरून - शुक्रवार हा कोणताही बेत करण्याला घात वार आहे हेंच खरें. दुसरा म्हणतोः–परवां रात्रभर आमचें घरावर पिंगळा ओरडत होता व दुसरें दिवशीं आमची आजी वारली, तसेंच चार महिन्यापूर्वी आमचे आंगणांतील शेवग्याचें झाडावर एकदां घुबड येऊन बसलें होतें व त्याच दिवशीं संध्याकाळीं आमचा मामा बद्या तापानें वारल्याबद्दल मुंबईहून पत्र आलें; यावरून पिंगळा घुबड हे पक्षी अशुभकारक आहेत यांत संशय नाही. तिसरा सांगतो:-काल साहेबांकडे नोकरी मागायला निघालों तों दारांतच मांजर आडवें गेलें. तसाच बंगल्यांत गेलो, परंतु साहेब अजारी ! भेट झाली नाही. दुसरें दिवशीं निघालों तों समोरून रिकामी घागर घेऊन एक बाई येत होती. बंगल्यांत गेलों तीं साहेबाचे व मेमसाहेबाचें । • कडाक्याचें भांडण सुरूं झालें आहे असें ऐकिलें ! अशा ) वेळीं आपली गोष्ट काढणें अप्रशस्त असें समजून मुकाव्यानें परत आलों. तिसरें दिवशीं निघालों तों समोरून एक उघडा बोडका मनुष्य धांवत येतांना पाहिला. बंगुल्यांत गेलों. साहेबांनी महाबळेश्वरास कूच केलें असें कळलें ! एकंदरीत तिन्ही वेळां तीन अपशकून होऊन