पान:तर्कशास्त्र.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ス気乙 तर्कशाख्ञ. पणाचा एक एक काल असल्यामुळे दोहोंत सादृश्य आहे, त्याअर्थी म्हातारपणांचा व मरणाचाही एक एक काल दोहींत असला पाहिजे. परंतु शिक्षण, धर्मश्रद्धा इत्यादि । गोष्टी कांहीं राष्ट्रांत आपला प्रभाव अशा रीतीनें गाजवीत असतील कीं, त्या राष्ट्रांस वृद्धावस्था व विनाशकाल ही कधींही येणार नाहींत. उपमेपासून जें अनुमान करितात तें असे असतें:-कांहीं ज्ञात बाबतींत पदार्थींचें एकमेकाशीं सादृश्य आहे; म्हणून दुस-या कांहीं अज्ञात बाबा’ तींतही त्यांचें सादृश्य असलें पाहिजे. हें अनुमान पुप्कळ वेळां खरें होतें. उदाहरणार्थ, एकादा अभिज्ञ असें अनुमान करिती:-हें चित्र कांहीं विशेष बाबतोंत रविवम्र्याच्या चित्रांसारखें दिसतें, यावरून हें त्याच चित्रकारानें काढिलेलें असावें. शरीरशास्त्रवेत्यास एकाद्या प्राण्याच्या एका मागील पायाचा फॉसिल ( वनस्पति किंवा ट्राण्यांचें शव जमिनींत कुजून त्युच्चे जागीं मातीचे कण येऊन बसतात, व कांहीं कालानें ते कण कठीण होऊन त्या प्राण्यांच्या व वनस्पतींच्या आकाराचे जे दगड बनतात त्यास फॉसिल म्हणतात ) सांपडला असतां, याच • रीतीनें तो असें अनुमान करती कीं, त्या प्राण्याचा दुसरा पायही याच आकाराचा असावा. पृथ्वीच्या पोटांत सांपडलेल्या कांहीं थोड्या हाडांवरून शरीरशास्रवेत्ता एका सर्वेद प्राण्याची रचना करूं शकतो ती बहुतेक अंशी याच तत्वावर. S R t W 리 R पूर्ण गुणांना.--सर्व शास्त्रीय विषयांत `ल्या विवक्षित गोष्टींच्या अवलोकना