पान:तर्कशास्त्र.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. ३१७ उच्च प्रतीच्या विषयांतही हा हेत्वाभास आढळतो. पाद्री लोक आपणांस अशा त-हेचे प्रश्न घालतात: * ख्रिस्तीधर्म स्वीकारण्यांत सदुण आहे हें तुम्हीं नाकबूल करितां?? “होय.' * तर मग ख्रिस्तीधर्मात नीतितत्वें आहेत हेंही तुम्हीं नाकबूल करितां ना ? ” हा हेत्वाभास न होऊं देण्याचा मार्ग हाच आहे कीं, प्रत्येक प्रश्नाचें वेगवेगळे अगदीं यथार्थ उत्तर द्यावें. ९०. ९. गृहीतग्राही अनुमान-या अनुमानोत्तींतील एक प्रतिज्ञा केवळ निगमनाच्या अर्थाची असते, किंवा निगमनाच्या योगानें सिद्ध झालेली असते. आमच्या वेदांत कांहीं गहन तत्वें अशीं आहेत कीं, तीं मनुष्यास आपल्या उपजतबुद्धीनें कधीही शोधितां आलीं नसती, यावरून वेद ईश्वरपूर्णतू आहेत असें एकाद्यास सिद्ध करितां येईल; परंतु असें सिद्ध केल्यानंतर पुन्हां, ही.तचें वेदांतू सांगितली आहेत म्हणून ही सूत्य आहेत, असें त्यास प्रतिपादन करितां येणार नाहीं. ईश्वराचें अस्तित्व व अद्वैतत्व उपनिषदांत वर्णिलें आहे. म्हणून तें खरें आहे असें स्थापित केल्यानंतर, ईश्वराचें स्वरूप, अस्तित्व व अद्वैतत्व यांचें उत्कृष्ट निरीक्षण उपनिषदांत केलें आहे. म्हणून उपनिषदें सत्य आहेत अर्स प्रतिपादन करितां येणार नाहीं. ९१. शुद्ध अनुमान व गृहीतग्राही अनुमान या दोहोंमधील भेद ध्यानांत ठेवावा. युद्ध अनुमानोतींतील दोहोंपैकी कोणतीही प्रतिज्ञा निगमनावर किंचितही अवलंबून राहात नाही; व निगमन-एकाच प्रतिज्ञेपा