पान:तर्कशास्त्र.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

3 तर्कशास्त्र कल्पना अजीबात सोडून दिल्यामुळे वरील अंजुमनात * अपूर्ण विभाग ? हा हेत्वाभास उत्पन्न झाला. याचप्रमाणें सर्व भाग एकमेकांपासून भिन्न नसतात: ह्मणजे त्यापैकीं कांहीं एकमेकांवर पडतात, असेंही वार्रवार घडते. जसे, एक पाण्यानें भरलेलें तळें रिकामें करावयार्च होतें. त्याला दोन युक्त्या निघाल्या. जवळच एक मोठा खळग्रा होता त्यांतून तळ्याचे बुडापर्यंत एक विवर खणावें ही एक किंवा पंप लावून पाणी उपसावें ही दुसरी. इतक्यांत एकानें तिसरी एक युक्ति सांगितली. ती ह्मणाला, ' खंडीभर साखर व एक खंडी लिंबाचा रस या तळ्यांत ओता ह्मणजे खासें सरबत होईल ! व मग या शहरांतील सर्व गुलहैसी लोक तळ्याभोंवतीं जमवा, व नंतर चोवीस तासांत सर्व तळे कोरडें ठणठणीत पडलें नाहीं तर मला विचारा! ? परंतु अशा त-हेनें पाणी उपसलें काय किंवा पंपानें उपसलें काय, प्रकार एकच, हैं वेन्याला उमगलैं नाहीं ! ८८. आतां यापुढे, केवळ शब्दांपासून नव्हे, तर शब्दाच्या अनुमानांतील परस्पर संबंधांपासून उत्पन्न होणाच्या हेत्वाभासांविषयीं विचार करणें आहे. ७. स्थान वारंवार बदलणें.-मनुष्य दलदलींतून क्रुिवा निसरड्या जमीनीवरून चालत असतो, तेव्हां एक ठिकाणीं पाय घसरू लागला असतां तो उचलन दुसर ठिकाणीं ठेवितो, तेथेंही घसरूं लागला म्हणजे तिसरे ठिकाणीं ठेविते, अशी जी त्याची स्थिति होते