पान:तर्कशास्त्र.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा. २०५ हें खुद्द गुण मोठे उदात्त आहेत, परंतु लोक चुकीनें उपाधनांच मूलतत्व · असें समजतात. आणि जेथें एका मनुष्यावर भक्ति करणें हें एका सबंद राष्ट्राशीं अभक्ति ( द्रोह) करण्य़ाप्रमाणें असूतें, तेथूल्या त्या भक्तांची, ज्यांचे हाती खरी सत्ता मुळींच नसते अशांची आज्ञा शिरसावंद्य मानण्याची, जी स्वतंत्रता कायद्याविरुद्ध असल्यामुळे केवळ उच्छंखलताच होऊन बसते अशा स्वतंत्रतेची, जी श्रद्धा केवळ भाविकताच असते अशा श्रद्धेची, व जो धर्म केवळ धर्मभेोळेपणाच असतो अशा धर्माची, ते फार प्रशंसा करितात. हिंदुस्थानांतील पत्रकारांसारखे राजभक्त पत्रकार दुसरे कोठंही सांपडणार नाहींत, असें असूनही त्यांना सरकार राजद्रोही समजतें तें याच रीतीनें, मुसलमानांच्या अमदानीत, ते इतर सर्व जातनां 'गनीम' या नांवानें हांक मारीत असत, किंवा पृथ्वीच्या पृष्ठ भागावर निरनिराळ्या दगडांचे थर कसे बनतात किंवा प्राणिवर्गाची प्रथम उत्पति कशी झाली हें ज्यांना सांगतां येत नाहीं त्यांनां कांहीं विद्वान् लोक शंख समजतात, तें याच रीतीर्ने. ८६. ३. व्यपदेश किंवा वक्रीति-एका आरोंपीनें खालील मुचलका लिहून देऊन शिक्षा माफ करून घेतली: 'मी पुन्हां चोरी करणार नाही केल्यास मला पांचशे रुपये दंड करावा.” पुढें लवकरच एका चोरीच्या खटल्यांत तोच आरोपी सांपडला. तेव्हां त्यानें उत्तर दिलें, पाहा ! मी पूर्वी लिहून दिलें आहे त्याचे विरुद्ध कांहींच केलें नाहीं. गी अर्स लिहून दिलें आहे कीं, 'मी पुन्हा