पान:तर्कशास्त्र.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग तिसरा २०३ कियेक लोक असें अनुमान करीत असतात कीं, ' ज्या देशांत संपति फार त्या देशाची भरभराट फार, व अभक्या’ एका राष्टांत संपति फार आहे, ह्मणून त्या राष्ट्राची भरभराट असली पाहिजे ? आतां या अनुमानोतींतील महत्प्रतिज्ञा जी आहे ती अर्थशास्त्रांतील एक सिद्धांत आहे, व त्यांतील ‘ संपात ? हा शब्द अर्थशास्त्रांतील विशिष्ट अर्थानें योजिलेला आहे, ह्मणजे तेथें * संपति ? याचा अर्थ ‘ जिच्या मोबदला कांहीं किंमत येते अशी प्रत्येक वस्तू' असा आहे. परंतु अल्पप्रतिज्ञेतील ' संपति ? या शब्दाचा केवळ व्यवहारिक अर्थ * नाणें, किंवा सोनें रुपें इत्यादि मैौल्यवान धातू ' अस्च बहुतेक् लोक घेत्तु, व त्यामुळे हें शुद्ध अनुमान न हाता हा हत्त्वाभास हाता. उष्णता, प्रकाश आणि रंग यांना खरोखर अस्तित्व आहे कीं नाहीं, या प्रश्नाबद्दल आजपर्यत बरेंच वाक्तांडव झालें आहे. कांहीं लोक या शब्दांचा अर्थ ' आपल्या शरीरास होणारी चेतना ' असा करतात; व कित्येक * ही चेतना उत्पन्न करणारे बाह्य गुण ” असा करितात. उष्णता म्हणजे ‘ गतीचा एक प्रकार ? आहे असें ऐकून आजमितीला देखील कित्येकजण मोठे बुचकळ्यांत पडतात; कारण त्यांची समजूत अशी आहे कीं, उष्णता हें आपल्या इंद्रियांस होणारें एक ज्ञान आहे, व त्याचें उत्पत्तिकारण कोणतेंही असलें, तरी तें केवळ ' एक गतीचा प्रकार' होऊं शकणार नाहीं.